Google Ad
Editor Choice

पुणे जिल्हाध्यक्ष डॉ. देविदास शेलार यांच्या बरोबर ऍड.अश्विनी बोगम, मधुकर पवार, सुषमा भालेकर आणि अतुल पवार यांच्यावर पुणे जिल्ह्याची जबाबदारी … आंतरराष्ट्रीय मानवाधिकार न्यायिक सुरक्षा परिषदेवर झाली निवड

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि. ०७ नोव्हेंबर २०२२) : आंतरराष्ट्रीय मानवी हक्क न्यायिक सुरक्षा परिषद ही समाजातील दुर्बल , अन्याय झालेल्या समाजाच्या घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी लढणारी भारतातील मोठी संस्था आहे . या संघटनेचे पुणे जिल्हा अध्यक्ष डॉ. देविदास शेलार यांच्या बरोबर संघटना वाढीचे कार्य तसेच सर्वसामान्यांना आपले न्याय हक्क मिळवून देण्याकरिता, पुणे जिल्हा प्रभारी पदी ऍड. अश्विनीताई बोगम, पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष पदी अतुल पवार, पुणे जिल्हा उपाध्यक्ष पदी मधुकर पवार, पुणे जिल्हा महिला उपाध्यक्ष पदी सुषमाताई भालेकर यांची निवड करण्यात आली आहे . कुलदीप सिंग (राष्ट्रीय कोषाध्यक्ष) यांनी त्यांना निवडीचे पत्र दिले.

याबाबत माहिती देताना ऍड. अश्विनी बोगम म्हणाल्या, “कि आमचा मुख्य उद्देश समाजाला गुन्हेगारी व गुन्हेगारांपासून मुक्त करणे , नागरिकांना कायदेशीर हक्क आणि योग्य न्याय देणे , जनतेच्या मनातून पोलिसांबद्दलची भीती दूर करणे , गरीब आणि असहाय लोकांना मदत करणे , महिलांवरील अत्याचार – शोषण थांबवन्यासाठी कार्य करणे , पर्यावरणीय प्रदूषणास प्रतिबंध , भ्रष्टाचाराला आळा घालणे , लोकांना त्यांच्या हक्कांबद्दल जागरूक करणे , सरकारी योजना सर्वसामान्य माणसापर्यंत (आम आदमीपर्यंत) पोहचवणे , समाजात प्रचलित असलेल्या कामगारांच्या शोषणाला प्रतिबंध करणे हा आहे . माझ्यावर दिलेली जिल्ह्या प्रभारी पदाची जबाबदारी मी सर्व सहकार्यांना बरोबर घेऊन पार पाडेल असा मला विश्वास आहे.

डॉ. देविदास शेलार हे पिंपरी चिंचवड शहरातील नवी सांगवी येथील रहिवासी असून, महाराष्ट्र14 न्यूज चे मुख्य संपादक आहेत. ते पिंपरी-चिंचवड शहरात अनेक वर्षांपासून सर्व समाजातील वंचित दुर्बल घटकांना बरोबर घेऊन त्यांना न्याय मिळवून देणे यासारखे समाजसेवेचे कार्य करत आहेत, ते भारतीय जनता पक्षाच्या सांगवी-काळेवाडी मंडल चे उपाध्यक्ष देखील आहेत. कोणत्याही वादात न पडता कोरोना महामारीच्या काळात त्यांनी चिंचवड विधानसभेचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या माध्यमातून वाखाण्याजोगी कामगिरी केली. त्यांच्या या सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांना आंतरराष्ट्रीय मानवाधिकार न्यायिक परिषदेच्या वतीने पुणे जिल्हाध्यक्ष म्हणून जबाबदारी सोपवली आहे.

Google Ad

सुषमाताई भालेकर या अध्ययन क्षेत्रात काम केल्यामुळे मुलाच्या समस्या काय आहेत त्या समजून घेऊन त्या सोडवण्याचा प्रयत्न करणे, अनाथ तसेच वयोवृद्ध व्यक्तींना गरजेच्या वस्तू पुरवणे, तसेच तसेच निराधार स्त्रियांना न्याय हक्क मिळवून देणे, त्यांना नोकरी मिळवून देणे स्त्रियांवरील अत्याचार होत असताना त्यांना समर्थपणे साथ देऊन त्यातून बाहेर काढणे, लहान मुलांना व तरुणांना गड किल्ले गडकिल्ल्यांवर घेऊन जाऊन महाराज काय होते हे दाखवणे संस्कृतीचे संवर्धन व जपणूक करणे हे कार्य त्या करत आहेत. पुणे जिल्ह्यात महिलांना न्याय हक्क मिळवून त्यांना स्वावलंबी व सक्षम बनवण्यासाठी खूप मोठे सामाजिक कार्य त्या करत आहेत.समाजाला गुन्हेगारी व गुन्हेगारांपासून मुक्त करणे, नागरिकांना कायदेशीर हक्क आणि योग्य न्याय देणे, गरीब आणि असहाय लोकांना मदत करणे, महिलांवरील अत्याचार थांबवण्यासाठी पुढाकार घेणे यांसह अन्य लोकोपयोगी कार्यास संघटनेच्या माध्यमातून प्राधान दिले जाणार आहे.

अतुल युवराज पवार
( पिंपरी चिंचवड शहर जिल्हा उपाध्यक्ष)

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!