Categories: Uncategorized

विकासाचा रथ पुढे सुरू ठेवण्यासाठी मतांचे दान माझ्या पदरात टाका; अश्विनी लक्ष्मण जगताप यांचे वाल्हेकरवाडीत मतदारांना आवाहन

विकासाचा रथ पुढे सुरू ठेवण्यासाठी मतांचे दान माझ्या पदरात टाका; अश्विनी लक्ष्मण जगताप यांचे वाल्हेकरवाडीत मतदारांना आवाहन

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि. १६ फेब्रुवारी) :  – चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीतील भारतीय जनता पार्टी, बाळासाहेबांची शिवसेना, आरपीआय (आठवले गट), रासप, शिवसंग्राम संघटना, रयत क्रांती संघटना, प्रहार संघटना या महायुतीच्या उमेदवार अश्विनी लक्ष्मण जगताप यांनी गुरूवारी (दि. १६) चिंचवड, वाल्हेकरवाडी भागातील नागरिकांच्या भेटीगाठी घेऊन संवाद साधला. दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप हे या शहराचे एकमेव विकासपुरूष होते. अश्विनी जगताप त्यांच्या पाठीशी खंबीरपणे होत्या. आता आम्ही अश्विनी लक्ष्मण जगताप यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहोत. त्या मतदारसंघाच्या सर्वांच्या जिवाभावाच्या आहेत. त्यामुळे पोटनिवडणुकीत त्यांनाच विजयी करण्याचा निर्धार वाल्हेकरवाडीतील जनतेने व्यक्त केला.

भाजपा व मित्र पक्षाच्या उमेदवार अश्विनी जगताप यांनी गुरूवारी वाल्हेकरवाडीत घरोघरी जाऊन सर्व नागरिकांशी संवाद केला. यावेळी माजी उपमहापौर सचिन चिंचवडे, माजी नगरसेविका करुणा चिंचवडे, भाजपचे शहर उपाध्यक्ष शेखर चिंचवडे, सामाजिक कार्यकर्त्या पल्लवी वाल्हेकर, सामाजिक कार्यकर्ते सचिन शिवले यांच्यासह भाजप तसेच बाळासाहेबांची शिवसेना, आरपीआय (आठवले गट), रासप, शिवसंग्राम संघटना, रयत क्रांती संघटना, प्रहार संघटना या मित्र पक्षांचे त्या भागातील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पती लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे जगताप कुटंब पोरके झाले असले तरी मतदारसंघातील जनतेने आम्हाला त्याची कधीही जाणीव होऊ दिली नाही. मतदारसंघातील जनता आमचे कुटुंबच आहे. मी तुमच्या कुटुंबातीलच एक सदस्य आहे. संपूर्ण मतदारसंघाला आपले कुटुंब मानणाऱ्या माझ्या पतीने प्रत्येक कुटुंब उभे राहावे यासाठी विकासाचे काम केले. मतदारसंघातील विकासाचा हा रथ असाच पुढे चालू ठेवायचा आहे. त्यासाठी आपण माझ्या पदरात मताचे दान टाकावे, असे आवाहन अश्विनी लक्ष्मण जगताप यांनी नागरिकांना केले. केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून मतदारसंघाच्या विकासासाठी काहीही कमी पडू देणार नसल्याचे वचनही त्यांनी नागरिकांना दिले.

वाल्हेकरवाडी भागातील नागरिकांनी अश्विनी लक्ष्मण जगताप यांचे जोरदार स्वागत केले. जागोजागी औक्षण करून त्यांना विजयासाठी शुभेच्छा दिल्या. त्यांच्या या संवाद फेरीमुळे वाल्हेकरवाडी भाजपमय झाले होते. चिंचवड आणि वाल्हेकरवाडी भागातील नागरिकांनी कायमच भाजपला साथ दिली आहे. चिंचवड मतदारसंघाच्या विकासासाठी दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांनी मोठे योगदान दिलेले आहे. त्यांचे विकासातील योगदान विसरण्यासारखे नाही. त्यांनी विकासाच्या माध्यमातून मतदारसंघाचा चेहरामोहरा बदलला. ते शहरातील एकमेव विकासपुरूष होते. अश्विनी जगताप ठामपणे त्यांच्या पाठीशी उभ्या होत्या. आता त्यांच्या पाठीशी भक्कमपणे आम्ही उभे असल्याच्या भावना वाल्हेकरवाडीतील नागरिकांनी व्यक्त केल्या. पोटनिवडणुकीत अश्विनी लक्ष्मण जगताप यांना भरघोस मतांनी विजयी करण्याचा निर्धारही वाल्हेकरवाडीतील नागरिकांनी व्यक्त केला.

Maharashtra14 News

Recent Posts

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या नव्या प्रशासकीय इमारतीला कामाला गती! … नागरिकांना मिळणार महापालिकेच्या सर्व सुविधा एकाच छताखाली

महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी, ११ ऑगस्ट २०२५ : पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांना महापालिकेच्या सर्व सुविधा…

1 day ago

चार वर्षात ६४ हजारांहून अधिक नागरिकांनी घेतला थकबाकी नसलेल्याचा दाखला

  यापूर्वी, नागरिकांना थकबाकी नसल्याचा दाखला मिळवण्यासाठी महापालिकेच्या कार्यालयात जाऊन अर्ज करावा लागे. अनेक वेळा…

2 days ago

जवानांना राख्या बांधून सांगवीच्या ‘द न्यू मिलेनियम इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनिअर कॉलेजचा रक्षाबंधन सण उत्साहात

  आमचे खरे आयडॉल हिरो तर तुम्हीच आहात, याची प्रचिती देत सर्व कर्नल व त्यांच्या…

2 days ago

रसिक प्रेक्षकांचे उदंड प्रेम, रंगभूमीचा आशिर्वाद २३ वर्षांच्या अथक प्रवासात ‘पुन्हा सही रे सही’ या नाटकाचा ४५०० प्रयोगांचा यशस्वी पल्ला

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.10 ऑगस्ट :- रसिक प्रेक्षकांचे उदंड प्रेम, रंगभूमीचा आशिर्वाद घेत २३ वर्षांच्या…

2 days ago

कबुतरे महत्त्वाची, रहिवासी नाहीत का ?? नागरिकांनी केला मोठा प्रश्न तर, पुण्यातही वाद पेटला

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.10 ऑगस्ट :- दादरमधील कबुतर खाना परिसरात यापुढे कोणालाच पक्ष्यांना धान्य घालता…

2 days ago

देवांग कोष्टी समाजातील मागील दीड वर्षापासून चा वाद संपुष्टात

महाराष्ट्र 14 न्यूज, दिनांक 10 ऑगस्ट : देवाग कोष्टी समाज पुणे या संस्थेच्या विश्वस्तपदाचा मागील…

3 days ago