Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

“गरज सरो वैद्य मरो” म्हणत खाजगी रुग्णालयातील डॉक्टरांनी केला पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासनाचा निषेध!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०८ जून) : कोरोना संकट काळात रुग्णांकडून शासकीय दरापेक्षा वाढीव दराने बिले आकारणाऱ्या खासगी रुग्णालयांवर कारवाईचा इशारा महापालिकेने दिला . आता शासन निर्णयानुसार महापालिका या रुग्णालयांचे ऑडिट करणार आहे, परंतु यात महापालिकेच्या चुकीच्या कार्यपध्दतीमुळे शहरातील लहान रुग्णालये नाहक भरडली जात असल्याचा आरोप करत या खाजगी रुग्णालयांच्या पिंपरी – चिंचवड हॉस्पिटल असोसिएशनकडून प्रशासनाचा निषेध केला आहे . पिंपरी – चिंचवड हॉस्पिटल असोसिएशनच्या वतीने मंगळवारी ( दि .०८) पत्रकार परिषद घेत यात वास्तव काय आणि सत्य परिस्थिती काय याची वास्तववादी भूमिका मांडण्यात आली.

यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष डॉ . गणेश भोईर , खजिनदार डॉ. माधव चव्हाण, सेक्रेटरी डॉ. प्रमोद कुबडे, उपाध्यक्ष संदीप सांडभोर , सहसचिव दीपक शिंदे , डॉ. अंजली दुधगावकर, डॉ.प्रशांत माने, डॉ.हितेंद्र अहिरराव, डॉ महेश कुदळे उपस्थित होते . यावेळी असोसिएशनचे पदाधिकारी म्हणाले की, रुग्णांना उपचार देणे ही आमची प्राथमिक जबाबदारी आहे आणि ती आम्ही योग्य रित्या पार पाडली या वेळी आम्ही स्वतः चा आणि प्रसंगी कुटुंबाचाही विचार केला नाही, त्यावेळी मात्र सर्वांच्या दृष्टीने आम्ही देव, योद्धे होतो.

Google Ad

परंतु आता “गरज सरो वैद्य मरो” अशी अवस्था आम्हा डॉक्टरांची झाली आहे, आणि याला येथील प्रशासन जबाबदार आहे. करोनाच्या संकट काळात काम करूनही आम्हा डॉक्टरांना अपमानास्पद वागणूक दिली जाते . समाजात आम्हा डॉक्टरांची प्रतिमा व्हिलन, लुटारू, दरोडेखोर अशी निर्माण केली जात आहे . त्यामध्येच महापालिका प्रशासनाकडून वेळोवेळी वेगवेगळे आदेश देऊन रुग्णालयास वेठीस धरून खच्चीकरण केले जात आहे . पहिल्या लाटेपेक्षा यावर्षी परिस्थिती खूपच वेगळी होती. रुग्ण हे घरीच आयसोलेशेन मध्ये होते आणि नंतर परिस्थिती हाताबाहेर गेल्यावर ऍडमिट होत होते, त्यामुळे मनुष्यबळावर, ऑक्सिजनवर, तपासण्यावर रुग्णालयांचा अधिक खर्च झाला आहे. अनेक साधनांवर खर्च करावा लागला आहे. यामुळे सहाजिकच रुग्णांचे बिल वाढले. कोविड रुग्णांच्या बिलांच्या ऑडिटमुळे गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे .

शासनाने ठरवून दिलेले दर आणि वास्तूस्थिती वेगळी आहे . याबाबत पालिकेला वेळोवेळी या गोष्टी दाखवून दिल्या आहेत . तरी देखील या ना त्या कारणाने मनस्ताप देण्याचे काम प्रशासन करत आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने पुर्नविचार करावा , अभ्यास करून त्याची अंमलबजावणी करावी, मोठी रुग्णालये आणि छोटी रुग्णालये यांना वेगवेगळ्या प्रकारची वागणूक प्रशासना कडून दिली जात असल्याचा आरोपही काही डॉक्टरांनी केला.

▶️काय आहेत,डॉक्टरांनी केलेल्या मागण्या:-

🟢मनपाने स्वतः चालवत असलेल्या जम्बो कोविड हॉस्पिटलचेही ऑडिट करावे व ते सर्वसामान्य नागरिकांसाठी खुले करावे.
🟢शेजारील राज्याच्या दरांचाही विचार करावा.
🟢रुग्ण किंवा नातेवाइकांनी मागणी केल्यासच ऑडिट करावे.
ऑडिट करण्यास तज्ञ डॉक्टरांची कमिटी असावी.
🟢दोन्ही बाजूंना म्हणणे मांडू द्यावे.
बिलात सूट किंवा बिल न देता रुग्ण सोडल्यास त्याची भरपाईची व्यवस्था प्रशासनाने करावी.

🟢काही मयत रुग्णांचे नातेवाईक बिल न भरता रुग्णांना घेऊन गेले, तर काहींनी अर्धवट बिल अदा केले.
🟢हॉस्पिटलमध्ये जे दरपत्रक लावले आहे ,त्यामुळे डॉक्टर आणि रुग्ण यात वेगळी भावना तयार होती याचा विचार करावा.
🟢अर्धवट माहितीच्या आधारे डॉक्टरांवर आरोप करू नयेत.
🟢पोलिसांनी खाजगी सुरक्षा रक्षक नेमण्यात यावा असे सांगून आम्हास माहिती द्यावी असे कळविले आहे, त्याचा विचार व्हावा.
🟢ज्या रुग्णालयांनी अवाजवी बिल लावले असेल, त्याची शहानिशा करून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी.

अशा अनेक मागण्या हॉस्पिटल असोसिएशनच्या वतीने करून काळी फीत लावून प्रशासनाचा निषेध नोंदवण्यात आला .

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!