Google Ad
Editor Choice

औंध पुणे जिल्हा सामान्य रुग्णालयात कायम स्वरूपी पोलीस चौकी सुरू करण्याची रुग्णालयातील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी केली मागणी!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि. १४ ऑगस्ट) : नुकत्याच चाकण ग्रामीण रुग्णालय मध्ये एका नर्स वर चाकू हल्ला करून तिला गंभीर जखमी केले आहे यामुळे सर्व नर्सेस आणि डॉक्टर्स मध्ये खळबळ उडाली आहे तरी या पाश्र्वभूमीवर औंध पुणे जिल्हा रुग्णालय मधील एकूण सर्वच शासकीय डॉक्टर्स आणि परिचारिकांनी पुणे जिल्हा रुग्णालय मध्ये पोलिस चौकी चालू करण्याची मागणी करण्यात आली आहे .

औंध पुणे जिल्हा सामन्य रुग्णालयात प्रथम दर्शनी भागात कॅसुअल्टी विभाग आहे या विभागात कोणताही रुग्ण हा अडमित होनेपूर्वी डॉक्टरांच्या कडून तपासला जातो रुग्ण आजारी असो वा अपघाती असो त्यावर तातडीने प्रथम दर्शनी उपचार हे डॉक्टर्स आणि नर्सेस कडून केले जातात्. यानंतरच सदर रुग्णाला दाखल (admit) करून संबंधित विभागात दाखल करून पुढील उपचार दिले जातात. काहीवेळा अपघाती किंवा गंभीर रुग्णा बरोबर दहा ते बारा लोकाचा ग्रुप रुग्णाच्या बरोबर येतो.

Google Ad

रात्री चे नाईट duty वेळी तर फारच गोंधळ घातला जातो तरी या ठिकाणी अपुरी सुरक्षा व्यवस्था सुरक्षा रक्षक असल्याने गोंधळ नियंत्रणात करता येत नाही, तसेच या रुग्णालयाच्या परिसरातील रात्रीचे वातावरण ही अंधकारमय असल्याने अनेक वेळा त्याचा फायदा घेऊन, नाही ते प्रकार घडतात. या ठिकाणी शवविच्छेदन विभाग असल्याने जवळच्या लोकांना या ठिकाणी रात्रीअपरात्री यावे लागते. याकरिता अनेक डॉक्टर्स आणि परिचारिकांच्या वतीने पुणे जिल्हा रुग्णालय मध्ये कायमस्वरूपी पोलिस चौकी चालू करावी अशी मागणी करण्यात आली आहे.

राज्यातील विविध जिल्हा रुग्णालय मध्ये पोलिस चौकी चालू आहेत या धर्तीवर पुणे जिल्हा रुग्णालय मध्ये पोलिस चौकी उभी राहिली तर डॉक्टर्स आणि परिचारिकांना दिलासा मिळणार आहे. याची प्रशासनाने दखल घ्यावी हीच अपेक्षा रुग्ण त्यांचे नातेवाईक तसेच डॉक्टर आणि इतर आरोग्य कर्मचारी करत आहेत.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

28 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!