Google Ad
Uncategorized

आगामी निवडणुकांचा दिवाळीत धुरळा? निवडणुकांचे दोन टप्पे शक्य

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि. ०८ मार्च) : देशात एप्रिल ते मे २०२४ मध्ये लोकसभा निवडणूक होणार आहे. त्यानंतर ऑक्टोबर २०२४ मध्ये विधानसभेची निवडणूक होणार आहे. त्यापूर्वी महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, नगरपंचायतीच्या निवडणुका घ्याव्या लागणार आहेत. आता शिंदे-फडणवीस सरकारने प्रशासकास तीन महिन्यांची मुदतवाढ दिल्यास निवडणुका जूनपर्यंत पुढे जातील. त्यानंतर पावसाळा असल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक दिवाळीतच होईल, अशी माहिती नगरविकास व ग्रामविकास विभागातील वरिष्ठ सूत्रांनी दिली.

स्थानिक स्वराज्य संस्थांवरील प्रशासकास तीन महिन्यांची मुदतवाढ दिल्यानंतर दिवाळीत महापालिका, नगरपालिका निवडणुकीचा पहिला टप्पा डिसेंबरअखेर पूर्ण होईल. त्यानंतर जानेवारी ते फेब्रुवारी २०२४ मध्ये जिल्हा परिषद, पंचायत समित्यांची निवडणूक घेणे शक्य होणार आहे. पण, त्यासंदर्भात आता सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Google Ad

राज्यातील २५ जिल्हा परिषदा, १४ महापालिका व २८४ पंचायत समित्यांसह नगरपालिका, नगरपंचायतींवरील प्रशासकास १५ ते २० मार्च रोजी वर्षपूर्ती होईल. तरीपण, त्या संस्थांच्या निवडणुका झालेल्या नाहीत,स्थानिक स्वराज्य संस्थांच्या नवीन प्रभाग रचनेवर १६ मार्च रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. तत्पूर्वी, प्रशासकास आणखी तीन महिन्यांची मुदतवाढ देण्याच्या दृष्टीने राज्य सरकारने नियोजन केल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.

राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि महापालिका निवडणुका २०१७ च्या प्रभाग रचनेप्रमाणेच होतील, असा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेतला. ठाकरे व शिंदे सरकारचा प्रभाग रचनेचा वाद आता सर्वोच्च न्यायालयात पोचला आहे. त्यावर १६ मार्च रोजी होणाऱ्या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Google Ad

Featured

Advertisement 1

Ad

Advertisement 2

ad

Advertisement 3

ad

Advertisement

error: Content is protected !!