दिवाळी हा सण गोड व्हावा म्हणून सोशल हॅंड्स दरवर्षी वंचित घटकांसाठी उपक्रम राबवून अनेक लोकांच्या जीवनातील तिमिराला प्रकाशाची वाट दिली आहे. याही वर्षी वायफळ खर्च न करता सोशल हॅन्डस फाउंडेशन सामाजिक बहुद्देशीय संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र येत विविध कार्यक्रम आणि उपक्रम या ठिकाणी पार पाडले. यासाठी संस्थेने प्रमुख पाहुणे म्हणून भवताल संस्थेचे संस्थापक, पर्यावरण तज्ञ अभिजीत घोरपडे यांना आमंत्रीत केले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला या आश्रमातील मुलांनी स्वागत गीत सादर करून सोशल हॅन्डस फाउंडेशन मधील सर्व पदाधिकाऱ्यांचे अनोख्या पद्धतीने स्वागत केले. त्याचबरोबर आईवर कवीता, तबला वादन, माहितीपर भाषण देखील यावेळी विद्यार्थ्यांकडून सादर करण्यात आले. यानंतर सोशल हॅन्डस फाउंडेशन बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने या विद्यार्थ्यांना दिवाळीच्या निमित्ताने विविध फराळाच्या पदार्थांचे वाटप करण्यात आले. तसेच विविध खेळांचे साहित्य गिफ्ट म्हणून देण्यात आले.
यावेळी भवताल संस्थेचे संस्थापक, पर्यावरण तज्ञ अभिजीत घोरपडे, ओझर्डे इंस्टीट्यूट ऑफ रॅडिकल एज्युकेशन संस्थेचे डायरेक्टर प्रा. भूषण ओझर्डे, ‘माऊली अनाथ आश्रम’चे संस्थापक अध्यक्ष प्रेममूर्ती नवनाथ लिम्हन महाराज, अद्वैत मीडिया संस्थेचे डायरेक्टर नितिन येलमार, सोशल हॅन्डस फाउंडेशनचे संस्थापक मदन दळे, सचिव सचिन अडागळे, अशोक एडगे, राज गोंगडे आदि मान्यवर उपस्थित होते.
अभिजीत घोरपडे यांनी मुलांमध्ये सोबत गप्पागोष्टी करत, अभ्यास करून पुढे जा अशी सूचना करतानाच चांगले लोक सदैव तुमच्या पाठीशी असल्याचे सांगितले. दिवाळीच्या आनंदात अनाथांना सामावून घेण्यासाठी सोशल हॅन्डस फाउंडेशन संस्थेच्या पुढाकाराचे कौतुक केले.
या मुलांना शैक्षणिक हातभार लाभावा म्हणून सोशल हॅन्डस फाउंडेशन संस्थेचे सल्लागार प्रा. भूषण ओझर्डे त्यांच्या ओझर्डे इंस्टीट्यूट ऑफ रॅडिकल एज्युकेशन या संस्थेमध्ये मोफत स्पर्धा परीक्षांचे प्रशिक्षण देण्याचे आश्वासन दिले. शैक्षणिक साहित्य वाटप देखील करण्यात आलं. तसेच सर्वांनी एकत्र येत यावेळी अनेक खेळ खेळले गेले.
आमच्या आई वडिलांचे छत्र हरपलं तेव्हापासून आम्ही या ठिकाणीच राहतो. दिवाळीनिमित्ताने सोशल हॅन्डस फाउंडेशन संस्थेचेच्या वतीने आमच्या जीवनातील दिवाळी प्रकाशमय व्हावी. म्हणून करण्यात आलेला हा छोटासा प्रयत्न आमच्यासाठी लाखमोलाचा असल्याची भावना यावेळी विद्यार्थ्यांनी बोलून दाखवली.
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२२ नोव्हेंबर : चिंचवड विधानसभा मतदारसंघात मतमोजणीसाठी प्रशासनाची थेरगाव येथील शंकर…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१७ नोव्हेंबर २०२४ : लोकशाहीचा उत्सव शांततेत व निर्भय वातावरणात पार पडावा,…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि. १५ नोव्हेंबर २०२४ - चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे भाजप - शिवसेना -…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि. १५ नोव्हेंबर २०२४) पिंपरी मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचे उमेदवार अण्णा बनसोडे…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१५ नोव्हेंबर २०२४ - चिंचवड विधानसभेत सध्या पिण्याचे पाणी, वाहतूक कोंडी, नदी…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि. १४:- चिंचवड विधानसभा मतदारसंघासाठी उपलब्ध मतदान यंत्रांच्या प्रथम आणि द्वितीय सरमिसळ…