Google Ad
Editor Choice

दिवाळी २०२१ : दिवाळीत घरी आणा ‘ या ‘ वस्तू , … कधीही जाणवणार नाही पैशांची कमतरता

महाराष्ट्र14 न्यूज, (दि.०३नोव्हेंबर) : यंदाही दिवाळी सणानिमित्त देशभरात मोठ्या उत्साहाचे वातावरण यला मिळतेय. लक्ष्मी मातेच्या आगमनासाठी घरा-घरात लगबग सुरु झाली आहे. या आगमनाची तयारी केल्यास सुख, समृद्धी, धन, धान्य प्राप्त होऊ शकते अशी मान्यता आहे.

यामुळे घराची साफसफाई, विद्युत रोषणाई, आणि फराळ अशा सर्व गोष्टी केल्या जाताययत. दिवाळीच्या दिवसांत लक्ष्मी मातेला पुजण्याची प्रथा आहे, देवा माता प्रसन्न होत भक्तांना त्यांच्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी आशीवार्द देते असा श्रद्धा आहे. या दिवाळी सणानिमित्त आपण तऱ्हे-तऱ्हेच्या वस्तू खरेदी करतो. मात्र अशाकाही वस्तू खरेदी करत तुम्ही मातेला प्रसन्न करु शकता. ज्यामुळे तुमच्या घरी कधीचं पैशांची तंगी जावणवणार नाही. जाणून घेऊ या वस्तूंबद्दल.

Google Ad

🏮मोरपंख
दिवाळीच्या दिवसांत मोराचे पंख घरी आणणे शुभ मानले जाते. मोराच्या पंखाने घरातील सुख-शांती अधिक वाढते. यासाठी मोर पंख घरातील आपल्या कामाच्या जागीच्या दक्षिण-पूर्व दिशेने ठेवा. असे केल्याने पैशांची तंगी दूर होते असा समज आहे.

🏮लक्ष्मी कुबेराची प्रतिमा
दिवाळीनिमित्त घरात आनंद, वैभव नांदवण्यासाठी लक्ष्मी- कुबेराची प्रतिमा खरेदी करा. या प्रतिमा तुम्ही घराच्या दरवाजावर लावा. असे केल्याने घरात पैशांची कमतरता केव्हा जाणवत नाही असे म्हटले जाते.

🏮धातूचा कासव
कासवाला फेंग शुई प्रथेनुसार शुभ मानले जाते. वास्तुशास्त्रातही कासवाला महत्त्वाचे स्थान आहे. दिवाळीत धातूने तयार केलेला कासव घरी आणल्यास सुख-शांती नांदते तर धन प्राप्ती होते असे म्हटले जाते.

🏮मातीचे मडके
दिवाळीत मातीचे मडके खरेदी करु शकता. या मातीच्या मडक्यात पाणी भरुन ते उत्तर दिशेने ठेवालयचे आहे. असे केल्याने घरातील पैशाची कमी दूर होण्यास मदत होईल असे म्हटले जाते.

🏮तांब्या-पितळाचे पिरॉमिड
दिवाळीत तांब्या-पितळेचे पिरॅमिड खरेदी करणं शुभ मानलं जातं. हे पिरॉमिड घरातील लिविंग रुममध्ये अशा जागी ठेवा ज्याठिकाणी तुम्ही कुटुंबीय अधिक वेळ घातवता. यामुळे कुटुंबातील सदस्यांचे आयुष्य वाढते आणि घरत पैशांची कमतरता जाणवत नाही.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

1 Comment

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!