Google Ad
Editor Choice Education

कोकण खेड युवाशक्तीच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त खेड तालुक्यातील २५ शाळांना लॅपटॉप चे वाटप!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०४एप्रिल) : पिंपरी चिंचवड मध्ये राहणाऱ्या खेड तालुक्यातील युवकांची एक सामाजिक संघटना आहे, या संघटनेच्या माध्यमातून दरवर्षी विविध सामाजिक आणि लोक उपयोगी उपक्रम राबविले जातात.

आज दिनांक ४ एप्रिल २०२२ रोजी कोकण खेड युवाशक्ती पिंपरी चिंचवडच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त कोकण खेड युवाशक्ती पिंपरी चिंचवड व पर्यावरण संवर्धन समिती पिंपरी चिंचवड यांच्या संयुक्त विद्यमाने रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील प्राथमिक जिल्हा परिषद शाळा व माध्यमिक शाळा अशा पंचवीस शाळांना आंबवली येथील जिल्हा परिषद शाळा आंबवली तसेच धामणंद येथील यशवंत विद्यालय धामणंद या ठिकाणी जावून शैक्षणिक कामकाजासाठी अत्यंत आवश्यक अशा लॅपटॉप कॉम्प्युटर व शैक्षणिक साहित्यांचे वाटप करण्यात आले.

Google Ad

श्री श्रीराम कदम यांच्या तर्फे जिल्हा परिषद शाळा तलवट पाळी या शाळेला रू 10,000 ची आर्थिक मदत करण्यात आली.यावेळी उपस्थित असणाऱ्या संबंधित सर्व शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक व ग्रामस्थांनी युवाशक्तीच्या या उपक्रमाचे कौतुक केले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. ह्या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी श्री अभिजीत कदम होते, तर कॅप्टन श्रीपत कदम, श्री शांताराम यादव, श्री मनोहर यादव, मुख्याध्यापक श्री देसाई सर, श्री पाटील सर यांनी आपले मनोगत व्यक्त केले व संस्थेच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. श्री संतोष शिर्के सर यांनी सूत्रसंचालन केले तर प्रा. संदिप कदम यांनी प्रास्तविक व्यक्त केले श्री सुरज उत्तेकर यांनी आभार मानले.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पर्यावरण संवर्धन समिती सदस्य श्री रुपेश कदम आणि श्री संदिप सकपाळ सर यांनी विशेष सहकार्य केले. या कार्यक्रमासाठी कोकण खेड युवाशक्तीचे श्री संदिप साळुंखे, श्री संदिप जाधव, श्री संतोष कदम, श्री नंदकुमार महाडिक, श्री अंकुर चव्हाण, श्री रुपेश मोरे, श्री अनिल कोकिरकर, श्री विजय शिंदे, राहुल ढेबे, श्री रोशन चाळके, श्री समीर चव्हाण, रोहन शिंदे, रोहित पवार, श्री समाधान कदम व कोकण खेड युवाशक्तीच्या सर्व सदस्यांनी सहभाग घेतला.
➖➖➖➖➖➖➖➖➖

 

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!