Google Ad
Editor Choice Education

शिक्षकांच्या आर्थिक मदतीतून … शिवाजी विद्यामंदिर,औंध प्रशालेत गरीब व गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय गणवेश वाटप

महाराष्ट्र 14 न्यूज (दि.०९ डिसेंबर) : श्री शिवाजी विद्यामंदिर,औंध प्रशालेत आज होतकरू,गरीब व गरजू विद्यार्थ्यांना प्रशालेतील सर्व शिक्षकांच्या आर्थिक सहकार्यातून मोफत शालेय गणवेश वाटप कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सेवानिवृत्त प्राचार्या श्रीम.कुसुम शर्मा यांच्या शुभहस्ते करण्यात आले.यावेळी प्राचार्य राजू दीक्षित, पर्यवेक्षिका भारती पवार, संस्थेचे कार्याध्यक्ष कांबळे वाय.जी. उपस्थित होते.

आपल्याला जे ध्येय साध्य करायचे आहे ते प्रथम निश्चित करा,कष्ट करा आणि प्रत्यक्ष कृतीत उतरवा.शालेय गणवेश मिळाल्यानंतर निरागस मुलांच्या चेहऱ्यावरील हास्य पाहून आनंद होत आहे.”असे कुसुम शर्मा यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले. “विद्यार्थ्यांनी स्वताशी प्रामाणिक रहावे.गरीबीत जन्माला येणं हा गुन्हा नाही परंतु या गरिबीची जाण ठेऊन तसेच सकारात्मक दृष्टिकोन ठेऊन उच्च शिक्षण घेऊन यशस्वी व्हायला पाहिजे “.असे प्रशालेचे प्राचार्य व कार्यक्रमाचे अध्यक्ष राजू दीक्षित यांनी सांगितले.

Google Ad

गेल्या दोन वर्षांपासून होतकरू व गरीब विदयार्थ्यांना शालेय गणवेश वाटप करण्याचा आम्हा सर्व शिक्षकांचा मानस होता परंतु कोविड सदृश परिस्थिमुळे शाळा बंद होत्या, आता शाळा चालू झाल्यामुळे कुसुम शर्मा मॅडम यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम यशस्वी होत आहे त्यामुळे आम्ही सर्व शिक्षक,विद्यार्थी आनंदी आहोत” असे शिक्षक प्रतिनिधी बिपीन बनकर यांनी सांगितले.* *कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सुधाकर कांबळे यांनी केले व गायत्री देशमुख यांनी आभार मानले.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!