Google Ad
Editor Choice Pune District

ह भ प श्री स्वप्निल ( महाराज ), श्रीकांत कदम, भाग्यदेव घुले, सागर साळुके, सनी कदम, प्रविण चव्हाण यांनी जपला माणुसकीचा धर्म …

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०९मे) : श्री मार्तंड देवस्थान जेजुरी संचालित कोविंड केअर सेंटर मध्ये कोवीड रुग्णांसाठी आज धान्य देण्यात आले. संपूर्ण जगात कोरोना चा संसर्ग झाला असून आपल्या देशात आणि आता आपल्या शहरात सुद्धा शिरकाव केला आहे. त्यावर मात करण्यासाठी आपले सरकार सर्व प्रयत्न करीत आहे. हि भयंकर साथ पसरु नये म्हणून शासनाने लॉकडाउन केले असून संचार बंदी जाहीर केली.

त्यामुळे निर्माण झालेली परिस्थिती मदत नव्हे कर्तव्यहा उपक्रम हाती घेवुन “श्री मार्तंड कोविड सेंटर जेजुरी ” ह्या ठिकाणच्या कोविड केअर सेंटर मध्ये उपचार घेत असणाऱ्या १५० बंधू-भगिनींनसाठी दररोजच्या जेवणासाठी उपयुक्त असे धान्य रुपी वस्तु आज आमदार मा. संजयजी जगताप ( पुरंदर-हवेली ) जेजुरीच्या नगराध्यक्ष सौ विणाताई सोनावणे, मार्तंड देवस्थान जे विश्वस्त मा. शिवराज झगडे व विश्वस्त मा.नगरसेवक अजिंक्य देशमुख नगरसेविका सौ रुक्मिणी ताई जगताप “देवस्थान चे प्रमुख विश्वस्त संदिप (आप्पा) जगताप” मा.शहराध्यक्ष भा ज पा श्री अशोक खोमणे ह्यांच्या कडे सुपूर्द केले…

Google Ad

यावेळी बोलताना ह.भ.प.श्री स्वफ्निल (महाराज) श्रीकांत कदम म्हणाले, “आपणा-सर्वांसाठी खंडेराया जवळ एकच मागणं आहे येणारा काळ आपणाकरीता आपल्या स्वजनांकरीता आरोग्यदायी रहावो ….!

तसेच भाग्यदेव एकनाथ घुले यांनी आपण लवकरच सर्वजन या परिस्थितीतून बाहेर येवु यासाठी सर्वांच्या वतीने श्री खंडेराया चरणी प्रार्थना केली. आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो याच भावनेने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक बांधिलकी जपत हा उपक्रम राबवला.
अशा प्रकारच्या गरजेच्या वस्तूंच्या वाटपाद्वारे छोटीशी मदत करण्यासाठी ह.भ.प.श्री.स्वप्निल ( महाराज ) श्रीकांत कदम (सचिव पुणे जिल्हा युवा समिती अखिल भारतीय वारकरी महामंडळ) श्री भाग्यदेव एकनाथ घुले ( शहराध्यक्ष पोलीस फ्रेंड्स वेल्फेअर असोसिएशन पिंपरी चिंचवड शहर ) श्री.सागर विलास साळुंके श्री.सनी दिलीप कदम, श्री.प्रविण वसंत चव्हाण दत्ता आनंदा घुले. दत्ता घुले, दत्तात्रय (बाळु) घुले, आदि उपस्थित होते.

ह.भ.प.श्री स्वप्निल (महाराज) श्रीकांत कदम आणि भाग्यदेव ए घुले,यांनी म्हटले अशा प्रकारे येणाऱ्या प्रत्येक संकट प्रसंगी आम्ही सदैव आपल्या सोबत आहोत असे “श्री मार्तंड कोविड सेंटर जेजुरी” यांना सांगितले. यावेळी महापालिका प्रशासनास सहकार्य करा असे आवाहन जेजुरी करांना करण्यात आले.

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!