महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०३ जुलै) : विरोधी पक्षनेते असलेल्या अजित पवारांनी दि. २ जुलै रोजी राजकीय बंड करत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. यावेळी राष्ट्रवादीच्या ९ आमदारांनी देखील मंत्री पदाची शपथ घेतली आहे. मात्र आता या शपथ घेणाऱ्या मंत्र्याविरूद्ध अपत्रातेची नोटीस दाखल केली आहे.
या नऊ आमदारांनी कोणतीही पुर्व कल्पना न देता पक्षाच्या विरोधात जाऊन राजभवनात शपथ घेतली. ही कृती पक्षाच्या विरोधात आहे. त्यामुळे त्यांनी केलेली कृती बेकायदेशीर आहे. त्यामुळे दांडेगावकर यांच्या अध्यक्षतेखालील शिस्तपालन समितीने या कृतीची नोंद घेत या सदस्यांवर अपात्रातेच्या कारवाई संदर्भात विधानसभा अध्यक्षांकडे तक्रार पाठवली आहे. तसेच या संदर्भात आमदारांना अपात्र करण्याबाबत विधानसभा अध्यक्षांना मेलद्वारे विनंती केली आहे.त्यामुळे विधानसभा अध्यक्षांनी आमची बाजू ऐकून घ्यावी, ही विनंती केल्याची माहिती जयंत पाटील यांनी दिली.
महाराष्ट्र 14 न्यूज, (पिंपरी) दि. २४ एप्रिल २०२५ : मुख्यमंत्री १०० दिवस उपक्रमाची पिंपरी चिंचवड…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१३ एप्रिल) : रविवार दिनांक 13 एप्रिल 2025 रोजी सौ.सारिका कृष्णा भंडलकर…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि. ०९ एप्रिल : पीडित महिलेला स्थानिक पातळीवर तात्काळ मदत मिळावी, कोणतीही…
पिंपरी चिंचवड शहराचा दळणवळणाचा विकास आरखडा ठरवताना लोकप्रतिनिधींच्या सूचनांचा विचार करून निर्णय घेणार... : पुणे…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि. ३१ मार्च २०२५ - पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने सांगवी किवळे रस्त्यावर…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२५ मार्च : आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत…