Categories: Uncategorized

छत्रपती कारखान्याचा कारभार दोन वर्गमित्रांकडे … जाचक नवे अध्यक्ष; तर कैलास गावडे नवे उपाध्यक्ष !

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२७ मे : इंदापूर तालुक्यातील छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार व क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे यांच्या नेतृत्वाखालील जय भवानी माता पॅनल सत्तेवर आले आज छत्रपती कारखान्याच्या नवनिर्वाचित संचालकांची बैठक झाल्यानंतर कारखान्याच्या अध्यक्षपदी अपेक्षेप्रमाणे पृथ्वीराज जाचक यांची निवड बिनविरोध झाली तर उपाध्यक्षपदी गुणवडी गटातून कैलास रामचंद्र गावडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

या दोघांचे वैशिष्ट्य असे की, हे दोघेही वर्गमित्र आहेत आणि दोघेही कृषी पदवीधर आहेत. त्यामुळे कारखान्याला उच्चशिक्षित कारभाऱ्यांची जोडगोळी या पुढील वर्षभरात कामकाज करेल. पृथ्वीराज हे देखील कृषी पदवीधर आहेत आणि कैलास गावडे हे देखील कृषी पदवीधर आहेत. छत्रपती कारखान्याच्या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान पृथ्वीराज जाचक सातत्याने या संचालक मंडळात तीन कृषी पदवीधर असल्याचे सांगत होते. त्यापैकी दोघा कृषी परिवारांना कारखान्याच्या कारभाराची संधी मिळाली आहे.

आज सकाळी काटेवाडी येथील निवासस्थानी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या समवेत नवनिर्वाचित संचालकांची बैठक झाली. त्यामध्ये अध्यक्ष उपाध्यक्षांची नावे सुचवण्यात आली आणि त्यानंतर हे सर्व संचालक कारखान्यावर पोहोचले. तेथे प्रांताधिकारी व निवडणूक निर्णय अधिकारी वैभव नावडकर, बारामती सहकारी संस्थेचे सहाय्यक निबंधक श्री दुरगुडे व इंदापूरचे सहाय्यक निबंधक श्री गायकवाड यांच्या उपस्थितीमध्ये निवडणुकीची प्रक्रिया झाली.

यामध्ये पृथ्वीराज जाचक यांचे नाव अध्यक्षपदासाठी सर्वानुमते बिनविरोध निवडण्यात आले. त्यानंतर उपाध्यक्ष पदाची निवड प्रक्रिया सुरू झाली. त्यामध्ये कैलास गावडे यांचे नाव संचालक शरद जामदार यांनी सुचवले. त्याला पृथ्वीराज घोलप यांनी अनुमोदन दिले आणि त्यांची ही निवड बिनविरोध झाली.

यावेळी सत्काराला उत्तर देताना नवनिर्वाचित अध्यक्ष पृथ्वीराज जाचक म्हणाले, या छत्रपती कारखान्याचा नावलौकिक पुन्हा गतवैभवाला साजेशा करणार आहोत. आजपर्यंत सर्वांनी सहकार्य केले, ते मी शब्दात मांडू शकत नाही. या पुढील काळातही तुम्हाला अपेक्षित असाच कारभार करून दाखवू, अशी संचालक मंडळाच्या वतीने ग्वाही देतो. दरम्यान यावेळी पृथ्वीराज जाचक भावुक झाले होते.

Maharashtra14 News

Recent Posts

अभिजात मराठी भाषेच्या वैभवशाली परंपरेची ग्रंथदिंडी पिंपरी चिंचवडमध्ये उत्साहात….* *मराठी संस्कृती, साहित्य आणि अस्मितेचा जागर, शाळकरी विद्यार्थ्यांसह अबालवृद्धांचा सहभाग….

*अभिजात मराठी भाषेच्या वैभवशाली परंपरेची ग्रंथदिंडी पिंपरी चिंचवडमध्ये उत्साहात....* *मराठी संस्कृती, साहित्य आणि अस्मितेचा जागर,…

5 days ago

पिंपरी चिंचवड महापालिका, वन विभाग व वेदव्यास प्रतिष्ठान पुणे संयुक्त उपक्रमातून एक लाख देशी वृक्ष लागवड करण्याचे नियोजन

*डुडूळगाव येथे देशी वृक्ष लागवड मोहिमेस सुरुवात* *पिंपरी चिंचवड महापालिका, वन विभाग व वेदव्यास प्रतिष्ठान…

1 week ago

पिंपरी चिंचवड मनपाच्या वतीने दिव्यांग सर्वेक्षणासाठी आशा सेविकांना देण्यात आले विशेष प्रशिक्षण

महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी २६ सप्टेंबर २०२५ :* पिंपरी चिंचवड महापालिका आणि दिव्यांग भवन यांच्या…

2 weeks ago

शंभरपेक्षा अधिक घरफोड्या, सराईत गुन्हेगाराला सांगवी पोलिसांनी ठोकल्या बेड्या

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.21सप्टेंबर  : शंभरपेक्षा अधिक घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला सांगवी पोलिसांनी अटक केली…

2 weeks ago

पुण्यात इंटेन्सिफाईड आयईसी कॅम्पेन अंतर्गत शाळा आणि महाविद्यालयात ‘एचआयव्ही’बाबत जागृती

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.18 सप्टेंबर :- महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था, मुंबई अंतर्गत जिल्हा एड्स…

3 weeks ago