Google Ad
Editor Choice

पतीच्या निधनाचे दुःख पचवत … बारावीच्या यशाला गवसणी

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१० जून) : पिंपळे गुरव येथील साठ फुटी रोड देवकर पार्कमध्ये वास्तव्यास असणारे ज्योती लोखंडे- गवारे हिचा विवाह २००९ मध्ये झाला. गुण्या गोविंदाने संसार करीत असताना दोन फुले उमलली. लग्ना आधी फक्त सातवी शिक्षण पूर्ण केले होते. पती सचिन गवारे यांनी ज्योतीचे खंडित झालेले शिक्षण पूर्ण करण्याचा मानस होता. २०१३ मध्ये ज्योती दहावी उत्तीर्ण झाली. त्यानंतर पुन्हा शिक्षणात खंड पडला. पतीची इच्छा होती पत्नीने बारावी शिक्षण पूर्ण करावे.

देशात कोरोनाच्या संसर्गाचा हाहाकार सुरू असताना पतीचे कोरोनाच्या संसर्गामुळे निधन झाले. त्यावेळी ती अकरावीमध्ये वाणिज्य शाखेत शिक्षण घेत होती. यावेळी डोंगराएवढे दुःख पचवत मुख गिळून आपल्या दोन्ही मुलांच्या शिक्षणात खंड पडू न देता अभ्यास करून स्वतः बारावीची परीक्षा दिली. नुकताच बारावीचा निकाल लागला. यामध्ये तीने ५१.६७ टक्के गुण मिळविणे उत्तीर्ण झाली.

Google Ad

चिंचवड येथील चिंतामणी रात्र प्रशालयातून बारावीची परीक्षा देणाऱ्या ज्योती हिने मराठी, अकाऊंट, मॅनेजमेंट, चिटणीस या विषयात १०० पैकी ६३ गुण मिळविले आहेत. आयुष्याच्या या आनंदाचा क्षण साजरा करण्यासाठी पती ह्यात नसले तरी त्यांनी पतीला दिलेले वचन पूर्ण करीत उत्तीर्ण होऊन दाखवले. दोन लहान मुले, वृद्ध सासू व अपंग नणंद यांचाही सांभाळ ज्योती करीत आहे. मुलगा जोशोआ बारा वर्षाचा तर मुलगी कियोना पाच वर्षांची आहे.

———————————————-
अशक्य होते ते शक्य झाले. केवळ पतीच्या शब्दांमुळेच मला अभ्यासाची प्रेरणा मिळाली. पतीला दिलेले वचन मी पूर्ण केले. रात्र प्रशालेच्या शिक्षकांनी मला सतत प्रोत्साहन दिले. मला माझ्या मुलांसाठी प्रेरणा बनायचे आहे.
ज्योती लोखंडे-गवारे

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!