Google Ad
Editor Choice Pune

आपण यांना पाहिलंत का ?येरवडा जेलमधून पळून गेले हे दोन कैदी … आहेत कोरोना पॉझिटिव्ह!

महाराष्ट्र 14 न्यूज : कोरोनाचा धोका राज्यात दिवसेंदिवस वाढतच आहे. यामध्ये रोज कोरोनाच्या नव्या रुग्णांची भर होते. अशात पुण्यातून एक हादरवून सोडणारी बातमी समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, येरवडा इथल्या कारागृहातून कैदी पळून जाण्याचे सत्र सुरुच आहे. या कारागृहातून पुन्हा एकदा दोन कैद्यांनी धूम ठोकली आहे. सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे हे दोन्ही कैदी कोरोना पॉझिटिव्ह आहेत. त्यामुळे पोलीस प्रशासनाची झोप उडाली आहे. दोन्ही कैद्यांचा युद्धपातळीवर शोध सुरू आहे.

अनिल विठ्ठल वेताळ (वय २१, रा- गणेश नगर, भीमा कोरेगाव, ता-शिरूर, जि- पुणे) आणि विशाल रामधन खरात (घर नं ५, फातिमा मशिदीसमोर श्री समर्थ हौसिंग सोसायटी, निगडी, पुणे) अशी पळून गेलेल्या कैद्यांची नाव आहेत. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. त्यामुळे हे कैदी कुठेही दिसल्यास पोलिसांशी संपर्क साधा असं आवाहन करण्यात आलं आहे.

Google Ad

वेताळ आणि खरात हे गंभीर गुन्ह्यातील आरोपी आहेत. ते सध्या न्यायालयीन कोठडीत होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्यांना तात्पुरत्या कारागृहाच्या इमारत क्रमांक १०४ मधील पहिल्या मजल्यावरील रुम नंबर 1 मध्ये ठेवण्यात आले होते. संधीचा फायदा घेत त्यांनी येथून पळ काढला. दोन्ही कैदी हे कोरोना पॉझिटिव्ह आहेत. पोलिसांकडून त्यांचा शोध घेतला जात आहे. यापूर्वीही तात्पुरत्या कारागृहातून कैदी पळून गेले होते. यातील काहींना नंतर पुन्हा अटक करण्यात आली होती. एकीकडे असे प्रकार वारंवार समोर येत असताना दुसरीकडे पुण्यात कोरोनाचा धोका वाढत आहे.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

557 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement