Google Ad
Editor Choice

पुण्याच्या ‘धनश्री वाघ पाटील’ यांचा विदेशातील भारतीयांना मदतीचा हात … पहा, कसे चालते रेडिओ संस्थेचे कार्य

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.३० सप्टेंबर) : जगभरात प्रवासी भारतीयांच्या समस्या दिवसेंदिवस वाढत आहेत अश्यातच वाढणारी एक समस्या म्हणजे फसव्या एजेंट ने दिलेल्या खोट्या नोकरीच्या प्रलोभनांना फसून विदेशात गेलेले आणि तिथेच अडकून राहिलेले लोक. अशाच विदेशात अडकून राहिलेल्या लोकांसाठी कार्य करीत आहेत REDIO ( Rescuing Every Distressed Indian Overseas) ह्या संस्थेच्या जागतिक व्यवस्थापक धनश्री वाघ पाटील.

आपल्या सामाजिक कार्याची माहिती देताना धनश्री म्हणाल्या, “मुळात समाज सेवेचा वारसा मला माझ्या वडिलांकडून तसेच माहेरच्या कुटुंबा कडून आला आहे. आणि आता माझे पती कमलेश पाटील व मुले स्वरदा स्वराज याच्या सहकार्याने तो मी पुढे नेऊ शकले”.

धनश्री वाघ पाटील ह्या मूळच्या पुण्याच्या . शिक्षण पूर्ण झाल्या नंतर महाराष्ट्र शासन मान्य संस्था त्यांनी चालू केली आणि त्या माध्यमांतून अनेक महिलांना स्वयंरोजगार प्रशिक्षण देऊन स्वतःचा पायावर उभे राहण्यास मदत त्यांनी केली. त्याच दरम्यान लग्नानंतर त्यांचे पती कमलेश पाटील यांच्या नोकरी संदर्भात सौ पाटील यांना दुबई येथे स्थायिक व्हावे लागले . दुबई येथील १० वर्षाच्या वास्तव्यात धनश्री यांनी सेलिब्रेशन इव्हेंट च्या माध्यमातून अनेक इव्हेंट केले.

Google Ad

स्वतःचा व्यवसाय सुरळीत चालू असताना त्यांच्या आयुष्यात अचानक एक वळण आले आणि विदेशातील अडचणीत असलेल्या लोकांना मदत करण्याची संधी सौ पाटील यांना मिळाली. मार्च २०२० मध्ये जगभरात कोविड चे संकट आले आणि दुबई मधून भारतात व भारतात दुबई मधील विमान सेवा बंद झाली. वंदे भारत मिशन अंतर्गत बाकी सर्व राज्यात विमान सेवा चालू झाली पण महाराष्ट्रासाठी काही विमान सेवा चालू होई ना . त्या मुळे जवळ जवळ ६ हजार महाराष्ट्रीयन भारतात यायची वाट पाहत होते . ह्या मध्ये एक गर्भवती महिला, वयोवृद्ध पालक, अनेक मेडिकल इमर्जन्सी असलेले पेशंट होते. त्या वेळी ह्या सर्व लोकांना मदत करण्यासाठी धनश्री यांनी पुढाकार घेतला. ह्या लोकांना व्हॉट्सॲप ग्रूप च्या माध्यमातून एकत्र आणले. अनेक लोकांची नोकरी गेली होती त्यांना किराणा पुरविणे, मोफत वैद्यकीय सुविधा पुरविणे, काहींचे घराचे भाडे भरणे हे कार्य त्यांनी दुबई मधील सामाजिक संस्थांच्या मदतीने केले. त्याच दरम्यान त्यांचा संपर्क दुबई मधील व्यावसायिक श्री राहुल तुळपुळे याच्या बरोबर झाला. श्री राहुल तुळपुळे यांच्या सहकार्याने महाराष्ट्र मध्ये पहिल्या दोन चार्टर फ्लाईट चे आयोजन केले. तसेच दुबई मधील अल आदिल ट्रेडिंग चे धनंजय दातार यांच्या मदतीने हजारो भारतीय मजुरांना मोफत भारतात येण्यास मदत केली. त्या मुळे सौ पाटील यांचा नंबर फक्त दुबई मध्ये नाही तर सौदी मधील कामगार वर्गा पर्यंत पोहचला. लोकांचे भारतात येण्यासाठी मदत मागण्यासाठी अनेक फोन येऊ लागले. हे सर्व मदत कार्य धनश्री परराष्ट्र मंत्रालयाचे माजी सचिव डॉ ज्ञानेश्वर मुळे यांच्या मार्गदर्शनाने करू लागल्या परंतु ह्या कार्याचा पूर्ण जगभरात विस्तार करावा अशी इच्छा व्यक्त करून मुळे सरांनी रेडिओ ह्या संस्थेची जबाबदारी धनश्री यांच्या वर सोपविली. धनश्री रेडिओ ह्या संस्थेच्या वैश्विक व्यवस्थापक म्हणून कार्य करीत आहेत.

REDIO ( Rescuing Every Distressed Indian Overseas) हा उपक्रम डॉ ज्ञानेश्वर मुळे, माजी सचिव विदेश मंत्रालय , सदस्य राष्ट्रीय मानवाधिकार आयोग यांच्या चांगुलपणाच्या चळवळी चा एक उपक्रम आहे . ज्या अंतर्गत विदेश स्थित अडचणीत असलेल्या भारतीयांना भारतात परत येण्यासाठी मदत केली जाते. भारतातील ३ कोटी पेक्षा जास्त लोक विदेशात राहतात. हे लोक वेगवेगळ्या कारणांनी विदेशात संकटात सापडतात कधी त्यांना फसविले जाते , अनेकांचे पासपोर्ट कंपनी मालका कडून जप्त केलेले असतात, काही लोक निर्दोष असताना देखील तुरुंगात अडकतात. अशा लोकांना मदत करण्या करिता भारत सरकार तत्पर असते पण अशा वेळी नक्की मदत कुठून आणि कशी मिळेल हे अनेक लोकांना माहीत नसते. अशा वेळी या लोकांना योग्य दिशा देऊन भारतीय दूतावास व आमचे विदेशातील सल्लागार यांच्या मदतीने आज पर्यंत १५० भारतीयांना आम्ही भारतात येण्यास मदत केली आहे. सुमारे १८ देशात रेडिओ संस्था कार्यरत आहे.

अनेक महिला फसव्या एजंट च्या प्रलोभनांना बळी पडून अखाता मध्ये संकटात सापडतात अशांना देखील रेडिओ च्या माध्यमातून मदत केली गेली आहे. सर्व सामान्य जनतेला या मध्ये सामील होऊन विदेशातील बंधू भगिनींना मदत करावी असा उद्देश रेडिओ चा आहे.

तसेच फसव्या एजंट च्या नोकरीच्या खोट्या अमिषाला भुलून न जाता भारत सरकार ने ठरवून दिलेल्या प्रक्रिया पुर्ण करून , योग्य कागदपत्रांची पडताळणी करूनच विदेशात जावे, सर्व सामान्य जनतेने विदेशात जाण्या पूर्वी ही खबरदारी घेतली तर तिथे जाऊन ते संकटात सापडणाऱ्या नागरिकांची संख्या कमी होईल.. असे सौ पाटील यांनी सांगितले. विदेशात जाण्या पूर्वी कशा प्रकारची खबरदारी घ्यावी, तसेच कोणत्या कागदपत्रांची पूर्तता केली असावी, सरकारमान्य एजंट ची पडताळणी कशी करावी या साठी रेडिओ च्या माध्यमातून जनजागृती अभियान राबविण्यात येणार आहे .

रेडिओ ह्या संस्थेचे कार्य मुख्य करून दुबई, शार्जाह, संपूर्ण आखाती देशात, सौदी अरेबिया, कॅनडा , लंडन, पोलंड, साऊथ आफ्रिका, सिंगापूर, मलेशिया, थायलंड,चीन, अमेरिका , जर्मनी अशा अनेक देशांमध्ये चालते. नुकतेच फसव्या एजंट मुळे दुबई मध्ये अडकलेल्या हिमाचल प्रदेश येथील युवकांची सुटका रेडिओ टीम च्या सहकार्याने झाली.

नुकतेच झालेल्या रशिया युक्रेन युद्ध परिस्थिती मध्ये सौ पाटील व रेडिओ टीम ने ४८२० विद्यार्थ्यांना भारतात येण्यास मदत केली. युक्रेन येथील भारतीय दूतावास, भारत सरकार आणि विद्यार्थी पालक यांच्या मधील दुवा म्हणून धनश्री व त्यांच्या सहकाऱ्यांनी उत्तम भूमिका बजावली.

भारतात देखील या संस्थेचे काम उल्लेखनीय आहे. आखाती देशात २ महिने एका मृत व्यक्ती चे शव भारतात नातेवाईकांचा शोध न लागल्याने आखातातील रुग्णालयात २ महिने अंत्यसंस्काराच्या प्रतीक्षेत असतात रेडिओ टीम च्या सहकार्याने त्या मृत व्यक्तीच्या नातेवाईकांचा शोध अवघ्या १ तासात केरळ मध्ये लावला गेला व त्वरित त्या मृत व्यक्तीच्या अंत्य संस्काराचे कागदोपत्री औपचारिकता पूर्ण करण्यात आली. नुकतेच सौदी अरेबिया येथून व दुबई येथून मृत व्यक्तींचे शव त्यांच्या कुटुंबीय पर्यंत पोहचविण्याचे सेवा कार्य रेडिओ ने केले.

मर्चंट नेव्ही मध्ये नोकरी करीत असताना विदेशात अडचणीत सापडलेल्या अनेक लोकांना रेडिओ मदत कार्य करीत असते. विदेशातील भारतीयांना मदत करण्याच्या आमच्या ह्या कार्यात सर्व सामान्य नागरिकांनी देखील सामील व्हावे असे आवाहन धनश्री पाटील यांनी केले आहे.

समाजातील सर्व स्त्री शक्तीला शुभेच्छा देताना धनश्री म्हणाल्या आपल्या देशातील अनेक महिला आपल्या कुटुंबाला आपल्या छोट्या मुलांना सोडून विदेशात नोकरी साठी जातात. तिथे त्यांना अनेक अडचणींना समोर जावे लागते पण ह्या माता आपले कष्ट ,दुःख आपल्या परिवारास कळू न देता आर्थिक सहाय्य करून आपल्या मुलांना शिक्षण देतात. त्यांची मुले मोठ्या पदावर नोकरीस आहेत. अशा महिलांच्या त्यागास आणि कर्तुत्वाला मनाचा मुजरा.

जे भारतीय विदेशात अडचणीत आहेत आणि त्यांना मदतीचा हात हवा आहे त्यांनी रेडिओ ह्या संस्थेला +९१ ९५०३१०७४१९ तसेच [email protected] ह्या ईमेल वर संपर्क साधावा.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement