Google Ad
Editor Choice

देवांग कोष्टी समाज पुणे ची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न. वर्षभरासाठी स्थापलेली ढोले यांची समिती बरखास्त

महाराष्ट्र 14 न्यूज, दिनांक १५ – देवांग कोष्टी समाज, पुणे या संस्थेची वार्षिक सर्व साधारण सभा दरवर्षी प्रमाणे सुभद्राबाई टोळगे सभागृह, देवांग होस्टेल, पिंपळे निलख येथे खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. देवी चौंडेश्वरीची आरती करून सभेला सुरुवात करण्यात आली. सभेच्या अध्यक्ष स्थानी श्री. सुरेश तावरे होते, सभेचे स्वागत उपाध्यक्ष सुनील ढगे यांनी केले.

अध्यक्षांनी मागील वर्षभराचा संस्थेच्या कार्याचा इतिवृत्तांत आजीव सभासदांना सांगितला. तसेच १९९१ पासूनचे मे . धर्मादाय आयुक्त कार्यालयातील संस्थेचे अनुपालन प्रलंबित होते. सदर प्रकरणी मे. धर्मादाय आयुक्त कार्यालयातून मंजूर स्कीम बद्दल सभासदांना सविस्तर माहिती दिली. सर्व आजीव सभासदांनी मंजूर स्कीम चे स्वागत केले. तसेच एक वर्ष भरा साठी स्थापन केलेली श्री. मल्हारराव ढोले यांचे नेतृत्वा खालील समिती यावेळी सर्वानुमते बरखास्त करण्यात आली.

Google Ad

तसेच आगामी काळात सुकाणू समिती, युवक आघाडी, महिला आघाडी, कौटुंबिक कायदेशीर समुपदेशन समिती व सल्लागार समिती स्थापन करून जास्तीत जास्त समाज बांधवांना कार्य करण्याची संधी उपलब्ध करण्याचे यावेळी जाहीर करण्यात आले. सभेचे सूत्र संचालन श्री दत्ता ढगे यांनी केले व सचिव सुनील डहाके यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Ad3
ad2
ad1
Google Ad

Featured

Advertisement 1

Ad

Advertisement 2

ad

Advertisement 3

ad

Advertisement

error: Content is protected !!