Google Ad
Uncategorized

देवांग कोष्टी समाजाचा … भाजपच्या उमेदवार अश्विनी लक्ष्मण जगताप यांना बिनशर्त पाठींबा

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि. १६ फेब्रुवारी) : चिंचवड विधानसभा मतदार संघातील निवडणूकीचे वातावरण तापू लागले आहे. सर्वच पक्ष आणि अपक्ष आपापले नशीब अजमवण्याचा प्रयत्न करत आहे.  परंतु चिंचवड विधानसभा पोटनिवडणूकीत भाजपा उमेदवार श्रीमती अश्विनी लक्ष्मण जगताप यांचे पारडे जड असल्याचे आज तरी दिसून येत आहे, त्यांना विविध संघटना आणि समाजाचा वाढता पाठींबा मिळत असल्याने त्यांचा विजयाचा मार्ग सुखकर होताना पाहायला मिळत आहे. आज देवांग कोष्टी समाजाचा बिनशर्त पाठींब्याचे पत्र भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष  चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे सुपूर्त करण्यात आले. यावेळी शहराध्यक्ष महेश दादा लांडगे, माजी महापौर माई ढोरे तसेच देवांग कोष्टी समाजाचे कार्याध्यक्ष  अशोक भुते, सचिव मा. सुनिल डहाके, सतिश लिपारे, भरत आमणे, राजेंद्र चोथे, मनोज पांडकर व अमोल तावरे आदी उपस्थीत होते.

देवांग कोष्टी समाजाचे जवळपास 5000 मतदार या चिंचवड विधानसभा मतदार संघात राहातात आणि सर्व समाजबंधव सुरुवातीपासून आ. लक्ष्मण जगताप यांचे खंदे समर्थक आहेत. दिवंगत आमदार लक्ष्मण भाऊंनी वेळोवेळी समाजाच्या अडी-अडचणी सोडवण्यासाठी केलेल्या मदतीस स्मरून समाजाने एकमताने ठराव करून अश्विनी जगताप यांना बिनशर्त पाठींबा देण्याचे ठरविले व तसे पत्र प्रदेशाध्यक्ष यांना दिले.

Google Ad

त्यामुळे सर्व समाजबांधव अश्विनी जगताप यांचे पाठीशी भक्कमपणे उभे असुन त्यांना भरघोस मतांनी निवडून येणार याची ग्वाही यावेळी प्रदेशाध्यक्षांना समाजाच्या शिष्टमंडळाच्या वतीने देण्यात आली असल्याची माहिती अध्यक्ष सुरेश तावरे यांनी दिली.

 

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Ad

Advertisement 2

ad

Advertisement 3

ad

Advertisement

error: Content is protected !!