महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२८ सप्टेंबर) : दापोडी नगरीतील गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी स्वागत व सत्कार शुभेच्छा देण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळ्यांचे वंशज नरवीर सुभेदार तानाजी मालसुरे यांचे वंशज सुभेदार कुणालदादा मालुसरे, सरसेनापती येसाजी कंक यांचे वंशज रवींद्र राजे कंक, सरदार हेबतराव शिळीमकर यांचे वंशज सरदार मंगेशदादा शिळीमकर, छत्रपती शिवाजी महाराजांचे मेहुणे श्रीमंत बंकी उर्फ कृष्णाजी गायकवाड यांचे वंशज श्रीमंत संतोष राजे, छत्रपती संभाजी महाराज यांचे दुधाभाऊ सरनोबत अंतोजी गाडे पाटील वीर धाराऊ माता गाडे पाटील यांचे वंशव सरनोबत अमितदादा गाडेपाटील, छत्रपती संभाजी राजे यांच्या पत्नी महाराणी येसूबाई व श्रीमंत पिलाजी राजे शिर्के यांचे वंशज श्रीमंत दीपक राजे शिर्के, सरदार हिरोजी इंदुलकर यांचे वंशज सरदार समीर प्रकाश इंदलकर या सर्वांच्या उपस्थितीमध्ये दापोडीतील तानाजी मालुसरे यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून स्वागत सत्कार कार्यक्रमाच्या ठिकाणी विसर्जन मिरवणुकीत सहभागी असणारे सर्व मंडळ वाद्यपदकांचा तुळशीचे रोप देऊन यांच्या हस्ते सत्कार स्वागत करण्यात आले.
यावेळी महाराष्ट्र प्रदेश भाजपा सचिव वर्षाताई डहाळे यांचा सुभेदार कुणालदादा मालुसरे यांच्या हस्ते व राष्ट्रीय खेळाडू राष्ट्रीय पंच पुरस्कार प्राप्त सौ. मालीनी सिंग तसेच विधान परिषद आमदार उमाताई खापरे, प्रदेश भाजपा सदस्य मा. नगरसेवक माऊलीभाऊ थोरात, सामाजिक कार्यकर्त्या प्रतिभाताई जवळकर, उद्योजक रघुनाथशेठ जवळकर, स्वागत सत्कार करण्यासाठी सन्माननीय उपस्थिती राहिली…!
स्व.प्रदीपदादा वाळुंजकर फाउंडेशनचे संस्थापक विशाल(आण्णा) वाळुंजकर, अध्यक्ष लक्ष्मणभाऊ दरेकर , सेक्रेटरी खुशाल आप्पा वाळुंजकर,कार्याध्यक्ष विशाल सातपुते, अमीरभाई शेख सुधीर चव्हाण, सुवर्णा कुटे, राजू कानडे ,सुभाष अग्रवाल, विष्णू अडागळे, आशिष वाळुंजकर ,युवराज वाळुंजकर उपस्थित होते..!
दापोडीतील गणेश विसर्जन मिरवणूक शांततेत व जल्लोष झाल्या…! सूत्रसंचालन विशाल सातपुते, स्वागत अमीर शेख,आभार सुधीर चव्हाण यांनी केले