Google Ad
Editor Choice Maharashtra

‘ डेरिंगबाज ‘ … मराठीतील पहिले अॅक्शन गीत प्रेक्षकांच्या भेटीस !

महाराष्ट्र 14 न्यूज : आदित्यराजे मराठे प्रॉडक्शनस व सॉंग सिटी मराठी निर्मित पहिलं गीत ‘डेरिंगबाज’ महाराष्ट्राचा नंबर १ लोकप्रिय चॅनेल संगीत मराठी प्रस्तुत करणार आहे.

आदित्यराजे मराठे प्रोडक्शन्स आजपर्यंतच्या यशानंतर प्रथमच सॉंग सिटी मराठी यांच्या सहयोगाने ‘डेरिंगबाज’ हे नव्या धाटणीचे गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आणत आहे. या गाण्यात प्रमुख भूमिका आदित्यराजे मराठे ह्यांची असून या गीताचे दिग्दर्शन साईनाथ पाटोळे यांनी केले आहे तर गीतकार राहुल सूर्यवंशी हे आहेत.

Google Ad

सामाजिक विषयावर आधारित असलेल्या या गीताच्या लाँचसाठी शुक्रवारी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी संगीत मराठी वाहिनीचे सर्वेसर्वा श्री दिपक देऊलकर, आदित्यराजे मराठे प्रोडक्शन्सचे अध्यक्ष आदित्यराजे मराठे, दिग्दर्शक साईनाथ पाटोळे आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना श्री दिपक देउलकर म्हणाले सॉंग सिटी मराठी बरोबर आदित्यराजे मराठे प्रोडक्शन यांची ही पहिली निर्मिती असून भविष्यात अनेक नवे प्रोजेक्ट्स सोबत करण्याचे योजिले आहे. मराठीत ॲक्शन गीत येत असल्यामुळें ही निर्मिती करणे धाडसाचे काम होते, ते आदित्यराजे आणि त्यांच्या टीम ने केले आहे.मराठी गीत,संगीताला मोठी परंपरा लाभलेली आहे तेव्हा एकाच पद्धतीची व ऱ्हिदमची गीतं न करता वेग वेगळ्या जॉनरची गाणी केल्यास प्रेक्षकांना तर मेजवानी मिळेलच पण म्युझिक इंडस्ट्रीला पुन्हा चांगले दिवस येतील.

तसेच संगीत मराठी चॅनेल वर गाणी लावण्यासाठी कोणत्याही एजन्टची किव्हा मध्यस्थांची गरज नसून निर्माते,दिग्दर्शक,गीतकार,संगीतकार,गायक,कलाकार आणि म्युझिक कंपन्या ह्यांनी थेट संगीत मराठीशी संपर्क साधावा, त्यांचे स्वागतच आहे असे ही श्री. दिपक देऊलकर म्हणाले.

ॲक्शन ही केवळ चित्रपटांत बघायला मिळते असं नव्हे तर *डेरिंगबाज* ह्या गीतात ऍक्शन,डान्स व रोमान्सही बघायला मिळणार आहे. ह्या गीतातील नायक समाजातील दुष्ट व खल प्रवृत्तींना वटणीवर आणण्यासाठी डेरिंगबाज होऊन जशाच तसे उत्तर देतो ही ह्या गाण्याची थीम आहे.हे गाणं अतिशय सुंदर रित्या शूट करण्यात आलं असून लोकांच्या पसंतीस उतरेल अशी आशा आहे.

हे गीत लवकरच संगीत मराठी वाहिनीवर प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या गीताला आदित्यराजे मराठे प्रोडक्शन, साईनाथ पाटोळे आणि त्यांच्या टीम ने नावीन्यपूर्ण पद्धतीने प्रत्यक्षात उतरवले आहे. हा अनुभव नक्कीच प्रेक्षकांना भुरळ पाडेल, अशी आशा संगीत मराठीचे सर्वेसर्वा दिपक देउलकर यांना आहे.

श्री. दीपक देउलकर, व आदित्यराजे मराठे म्हणाले, की भविष्यात महाराष्ट्रातील नवीन कलाकारानां सोबत घेऊन, सॉंग सिटी मराठी व आदित्यराजे मराठे प्रोडक्शन तर्फे एकत्र मिळून अनेक चित्रपट, मालिका, लघुचित्रपट, वीडियो अल्बम घेऊन येण्याचा मानस आहे.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

4 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!