Categories: Editor Choice

अंतराळ विज्ञान व तंत्रज्ञानात मनपाच्या शाळांमधील विद्यार्थ्यांकडून कौतुकास्पद प्रगतीचे प्रदर्शन

महाराष्ट्र 14 न्यूज, १५ डिसेंबर २०२२ : पाच सरकारी शाळांमधील १२० प्रतिभावंत विद्यार्थ्यांच्या गटांनी वार्षिक विज्ञान मेळाव्यात अंतराळ विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रात आपली प्रतिभा आणि उत्कृष्टता दाखवून दिली. पाच सरकारी शाळांमध्ये सुरू असलेल्या विशेष स्टेम (सायंस, टेक्नॉलॉजी, इंजिनीयरिंग आणि मॅथेमॅटिक्स) शिक्षण कार्यक्रमांमध्ये समावेश असलेल्या सुमारे २००० विद्यार्थ्यांमधून या मुलांची निवड झाली होती.

स्माईल फाऊंडेशन आपल्या मिशन एज्युकेशन कार्यक्रमाच्या अंतर्गत ‘बालकांमध्ये स्टेम शिक्षणाचा प्रसार‘ (प्रोमोटिंग एसटीईएम एज्युकेशन इन चिल्ड्रन) हा विशेष प्रकल्प चालवत आहे. अॅटलास कॉपको इंडिया लिमिटेडकडून मदत मिळत असलेल्या या प्रकल्पात पुण्याच्या पिंपरी चिंचवड महानगरपालिका (पीसीएमसी) भागातील पाच सरकारी शाळांमधील १९६५ बालकांवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. यातील बहुतांश बालके ही आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील आणि सामाजिकदृष्ट्या वंचित समुदायांतील आहेत.

या विद्यार्थ्यांनी अंतराळ विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील शास्त्रज्ञ आणि प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विकसित केलेली विविध मॉडेल्स तयार करून सादर केली होती. एरो मॉडेलिंग, उपग्रह आणि प्रक्षेपण वाहन प्रदर्शन, रॉकेट प्रक्षेपण प्रात्यक्षिक, यांसह इतर अनेक गोष्टींचा मेळाव्यातील विविध उपक्रमांमध्ये समावेश होता. त्यामुळे सहभागी विद्यार्थी आणि मेळाव्यात येणारे या दोघांमध्येही  उत्साह दिसून आला.

पीसीएमसीमधील पिंपळे गुरव माध्यमिक विद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या या वार्षिक विज्ञान मेळाव्याला इतर विविध शाळांमधील अन्य १२०० शालेय विद्यार्थ्यांनी व त्यांच्या पालकांनी भेट दिली.

स्माईल फाऊंडेशनचे कार्यकारी संचालक श्री. विक्रम सिंग वर्मा आणि अॅटलास कॉपकोचे कॉर्पोरेट एचआर हेड श्री. कबीर गायकवाड याच्या हस्ते वार्षिक विज्ञान मेळाव्या चे उद्घाटन करण्यात आले त्यावेळी शिक्षक आणि अन्य मान्यवर  उपस्थित होते.

स्माईल फाऊंडेशनचे कार्यकारी संचालक श्री. विक्रम सिंग वर्मा म्हणाले, “मुलांना योग्य अशा स्टेम शिक्षणाची ओळख आरंभीच करून दिली तर उद्या ते नवनव्या क्षेत्रांमध्ये उत्कृष्टता प्राप्त करतील. शिवाय समाजात नाविन्यता घेऊन येतील. बालके हे कोणत्याही राष्ट्राचे भविष्य असते. त्यामुळे ही पायाभूत तयारी त्यांना राष्ट्रनिर्माणात भरीव भूमिका पार पाडण्यास मदत करते.”  अॅटलास कॉपकोचे कॉर्पोरेट एचआर हेड श्री. कबीर गायकवाड म्हणाले, “विश्लेषणात्मक विचार करण्याची कौशल्ये आणि संकल्पना यांचा मुलांमध्ये विकास होण्याच्या दृष्टीने स्टेम शिक्षण आणि प्रयोगात्मक शिक्षण हे महत्त्वाचे आहेत. मुलांनी परिणामकारक शिक्षण घेऊन प्रगती करावी, यासाठी नवनवीन मार्गांचा शोध आपण घेत राहिला पाहिजे.”

स्टेम शिक्षण हे बालकांमध्ये कौशल्ये आणि संकल्पनांचा विकास होण्यासाठी महत्त्वाचे आहे कारण त्याचा मुख्य भर हा पाठांतरावर भर देणाऱ्या पारंपरिक शिक्षणापेक्षा कौशल्य आधारित शिक्षणावर आहे. उत्तम स्टेम शिक्षण हे विद्यार्थ्यांना मोठे झाल्यावर भविष्यगामी आणि नवनव्या क्षेत्रांमध्ये रोजगारक्षम बनवते. तसेच त्यांच्यामध्ये नवनव्या गरजांना अनुरूप कौशल्ये विकसित करते. बालके हे कोणत्याही राष्ट्राचे भविष्य असते. त्यामुळे ही पायाभूत तयारी त्यांना राष्ट्रनिर्माणात भरीव भूमिका पार पाडण्यास मदत करते.

बालकांमध्ये स्टेम शिक्षणाचा प्रसार प्रकल्पाची व्यापक उद्दिष्टे खालीलप्रमाणे आहेत:
· निर्माण करणे: गंभीर विचारवंत, समस्या सोडवणारे, पुढच्या पिढीतील प्रयोगशील व्यक्ती आणि तांत्रिक व्यक्तींची अत्यंत कुशल टीम घडवणे.
· बहुविविध करिअर विषयांची ओळख आणि त्यांच्याबद्दल जागरूकता
· शिक्षणाला चालना देणे: समस्या आणि चौकसपणा आधारित दृष्टिकोन, विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष उपक्रम सामील करून घेणे यांच्या माध्यमातून.
· कौशल्ये वाढवणे : चिकाटी, टीमवर्क आणि नवीन परिस्थितींमध्ये मिळालेल्या ज्ञानाचा वापर.
· जिज्ञासा आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे.
· ज्ञान देण्याचे आपले कौशल्य वाढवण्यासाठी शिक्षकांना सक्षम करणारे प्रभावी अध्यापनशास्त्र आणि संसाधने आणणे.

या प्रकल्पाचे अपेक्षित परिणाम असे आहेत:
· विद्यार्थ्यांना घोकंपट्टीच्या शिक्षणाकडून प्रत्यक्ष शिक्षणाकडे नेणे.
· विज्ञान आणि गणित विषयांतील शैक्षणिक कामगिरीत सुधारणा
· वर्गांमध्ये अधिक मुलांना बांधून ठेवणे.
· स्टेम अध्यापनशास्त्रातील शिक्षकांचे ज्ञान वाढवणे.

स्माईल फाउंडेशनबद्दल
स्माईल फाउंडेशन ही एक भारतीय विकास संघटना असून ती २६ राज्यांमधील २००० खेड्यांमध्ये आणि शहरी झोपडपट्ट्यांमध्ये असलेल्या शिक्षण, आरोग्यसेवा, उपजीविका आणि महिला सक्षमीकरण यावरील ४०० हून अधिक कल्याणकारी प्रकल्पांद्वारे दरवर्षी १५ लाखांपेक्षा जास्त बालकांना आणि कुटुंबांना थेट लाभ पोचवते.
www.smilefoundationindia.org

Maharashtra14 News

Recent Posts

तुमच्या इथे कोणाविरुद्ध कोण? जाणून घ्या, … पहा, महाराष्ट्रातील सर्व 48 मतदारसंघातील उमेदवारांची यादी!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०२ मे) : महाराष्ट्रातील 48 जागांपैकी 47 जागांवरील लढती कशा असतील हे…

1 day ago

अंध दिव्यांग नागरिकांना ब्रेल लिपीतील व्होटर स्लिपचे वाटप

महाराष्ट्र14 न्यूज, (दि.०२ मे) : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ अंतर्गत २०५ चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये मा.निवडणूक…

2 days ago

दिवांकुर संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप व आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०१ मे) : दिवांकुर संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप…

2 days ago

‘जर तुम्ही माझ्या बाबतीत काही चूक केली, तर पुन्हा माझ्याकडे पायरी चढायची नाही … नेत्याने दिला कार्यकर्त्याना दम

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२८ एप्रिल) : उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत.. बारामती तालुक्यातील…

5 days ago

महायुतीच्या विजयासाठी भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांचा शहरात बैठकांचा धडाका पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपच्या १०० हून अधिक नमो संवाद सभा

महाराष्ट्र 24 न्यूज, दि.२५ एप्रिल : मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजपा-राष्ट्रवादी-आरपीआय-मनसे-रासपा व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार श्रीरंगआप्पा…

1 week ago