Google Ad
Editor Choice

इंद्रायणीनगर भागात पीएमपीची बस सुविधा वाढवण्याची मागणी … शिवराज लांडगे, योगेश लांडगे यांनी घेतली अधिकाऱ्यांची भेट

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०९ नोव्हेंबर) : भोसरी इंद्रायणीनगर भागामध्ये पीएमपीएलच्या बसची फेऱ्यांची संख्या वाढवण्याची मागणी भाजपाच्या वतीने करण्यात आली आहे.

भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष शिवराज लांडगे आणि राष्ट्रीय खेळाडू योगेश लांडगे यांनी याबाबतचे निवेदन पुणे महानगर परिवहन महामंडळच्या (पीएमपी) कार्यालयाला भेट देऊन वाहतूक व्यवस्थापक  दत्तात्रेय झेंडे यांना दिले.

Google Ad

पिंपरी-चिंचवड शहरातील इंद्रायणीनगर हा अत्यंत प्रशस्त आणि रहिवासासाठी प्राधान्य दिला जाणारा परिसर आहे. अनेक विद्यार्थी इतर भागातून पिंपरी-चिंचवडमध्ये शिकण्यासाठी आल्यानंतर याच भागात राहण्यासाठी पसंती देतात. तर दुसरीकडे या भागातील लोकवस्ती गेल्या काही वर्षांत प्रचंड प्रमाणात वाढलेली आहे. येथील विद्यार्थी, नोकरी करणारे चाकरमानी, महिला या सर्वांना ये-जा करण्यासाठी पीएमपी प्रशासनाने मोजक्या बसची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. इंद्रायणीनगर मधून पिंपरी-चिंचवड किंवा पुणे शहरात जाण्यासाठी भोसरी,लांडेवाडी, एमआयडीसी कॉर्नर या ठिकाणी यावे लागते.त्यामुळे नागरिकांचा नाहक वेळ आणि पैसा खर्च होत आहे. त्यामुळे स्पाईन रोड संतनगर जय गणेश साम्राज्य मार्गे आळंदी- निगडी, निगडी-भोसरी अशी बस सेवा सुरू करण्याची गरज असल्याची भावना शिवराज लांडगे व योगेश लांडगे ह्यांनी मांडली.

पीएमपी प्रशासन सकारात्मक
इंद्राणीनगर, मोशी प्राधिकरण येथील नागरीक, विद्यार्थी व कामगार वर्गाच्या सोयीसाठी स्पाईन रोड संतनगर जय गणेश साम्राज्य मार्गे आळंदी- निगडी, निगडी-भोसरी बस सेवा चालू करण्या संदर्भात निवेदन दिले असून, या संदर्भात पीएमपी प्रशासनाने सकारात्मक भूमिका घेत लवकरच याच्यावर निर्णय घेण्याचे आश्वासन दिले आहे, असे शिवराज लांडगे यांनी सांगितले.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

31 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!