Google Ad
Uncategorized

गौतमी पाटीलची बदनामी करनार्‍या अज्ञाताविरोधात कडक कारवाई करण्याची पिंपरी युवासेनेची मागणी

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२७ फेब्रुवारी) : लोककलावंत गौतमी पाटील हिचा बदनामीकारक व्हिडिओ समाजमाध्यमांवर प्रसारित करणाऱ्यावर कारवाई करणेबाबत पिंपरी युवा सेनेच्या वतीने वरिष्ठ पोलीस निरीक्षक भोसरी पोलीस स्टेशन यांना कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.

पिंपरी युवा सेनेच्या वतीने वरिष्ठ पोलीस निरीक्षक भोसरी पोलीस स्टेशन यांना निवेदन देण्यात आले आहे, त्यात म्हटले आहे की, महाराष्ट्रातील कलाक्षेत्रात गौतमी पाटील हिने अल्पावधीतच महाराष्ट्रभर नाव कमावले परंतू प्रगती रोखता येईना गेली की समाजात बदनामी सुरू केली जाते.चुकीच्या पद्धतींने समाजमाध्यमातून गौतमी पाटीलला बदनाम करण्याचे षडयंत्र केले जातायत व्हिडिओचा प्रकार निंदनीय आहे. स्त्री कपडे बदलत असताना तिचा लपून काढलेला व्हिडिओ वायरल करणे ही मर्दांनगी नाही. कलाकार म्हणून तिची कदर करा मधल्या काळात अश्लील डान्स करून ती चुकली तिला ट्रोल केले तीने संपूर्ण महाराष्ट्राची माफी मागीतली अशातच ती पुन्हा कलाक्षेत्रात उंच गरूडझेप घेत असताना अशा चुकीच्या पद्धतीने व्हिडिओ वायरल करून समाजासमोर तिला नागड करणे योग्य नाही.

Google Ad

तरी पोलीस प्रशासनाला विनंती आहे की हा बदनामीकारक व्हिडिओ समाजमाध्यमांवर प्रसारित करणाऱ्यावर कडक कारवाई करण्यात यावी व यापुढील काळात लोककलावंतांची बदनामी विरोधात कठोर कायदा तयार करण्यात यावा असे निवेदन पिंपरी युवासेनेकडून भोसरी पोलीस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. भास्कर जाधव ह्यांना देण्यात आले. ह्यावेळेस पिंपरी युवा अधिकारी श्री.निलेश हाके, उपयुवा अधिकारी श्री. अविनाश जाधव, मनोज काची, चिंचप्पा निंगडॊळे, हृषीकेश माने, राजू खलसे, उपस्थित होते.

Google Ad

Featured

Advertisement 1

Ad

Advertisement 2

ad

Advertisement 3

ad

Advertisement

error: Content is protected !!