महाराष्ट्र 14 न्यूज : कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभुमीवर मोदी सरकारने आर्थिक मदतीची घोषणा केली आहे. या अंतर्गत केंद्र सरकारतर्फे शेतकऱ्याच्या खात्यात २ हजार रुपये दिले जाणार आहेत. प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजने अंतर्गत ( PKSY) पुढच्या महिन्यात शेतकर्यांच्या खात्यात हे पैसे येणार आहेत.
या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना प्रत्येक वर्षी ३ हफ्त्यांमध्ये ६ हजार रुपये दिले जाणार आहेत. आतापर्यंत या योजनेअंतर्गत १० कोटी शेतकऱ्यांना जोडण्यात आलंय. १ ऑगस्टपासून सरकार शेवटचा हफ्ता देणार आहे. नव्या वर्षात तुम्ही यासाठी अर्ज केला असेल लाभार्थ्यांच्या यादीत तुमचे नाव आलंय का हे पाहण्यासाठी pmkisan.gov.in वर तुम्हाला सर्व माहिती मिळेल.

5 Comments