Categories: Editor Choice

Delhi : पीएम किसान योजनेचे ६ हजार पती-पत्नी दोघांनाही मिळतात का? नेमका नियम काय?

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१९जुलै) : पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा नववा हप्ता लवकरच जारी करण्यात येणार आहे. मोदी सरकारने शेतकऱ्यांसाठी सुरू केलेल्या सर्व योजनांपैकी पंतप्रधान किसान योजना सर्वात यशस्वी असल्याचे म्हटलं जाते. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाकाठी 6 हजार रुपये मिळतात. प्रत्येकी दोन हजार रुपयांच्या हप्त्यात ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात पोहोचते. पंतप्रधान किसान योजनेसंदर्भात अनेक प्रकारचे प्रश्न शेतकऱ्यांच्या मनात अनेक प्रश्न असतात. यापैकी एक म्हणजे कोणत्याही शेतकरी पती पत्नीला वार्षिक 6-6 हजार रुपये स्वतंत्रपणे मिळू शकतात का हा आहे.

कुटुंबातील एका सदस्यालाच लाभ

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना शेतकरी कुटुंबांसाठी आहे. कुटुंब म्हणजे पती-पत्नी आणि दोन अल्पवयीन मुले अशी व्याख्या करण्यात आली आहे.त्यामुळं कुटुंबातील केवळ एका सदस्याला पंतप्रधान किसान सन्मान निधीचा लाभ मिळू शकेल.

नवरा बायको दोघांनाही पैसे मिळतील का?

कुटुंबातील पती-पत्नी दोघांनाही या योजनेचा लाभ मिळत असल्यास त्यांच्याकडून ही रक्कम वसूल केली जाऊ शकते. वास्तविक अशी अनेक प्रकरणे समोर आली आहेत की ज्यात पती-पत्नी दोघांनाही किसान सन्मान निधी योजनेचा लाभ मिळाला आहे. अशा लोकांकडून सरकार हप्त्याची रक्कम वसूल करत आहे जे योजनेसाठी पात्र नाहीत.

पीएम किसानचा लाभ कुणाला मिळत नाही

पीएम किसान सन्मान योजनेत सरकारी कर्मचारी किंवा प्राप्तिकर भरणारे शेतकरी पात्र मानले जात नाहीत. याशिवाय दहा हजार रुपयांपेक्षा जास्त पेन्शन मिळणारे डॉक्टर, अभियंता, सीए आणि कर्मचारीही पीएम किसान योजनेचा लाभ घेऊ शकत नाहीत. खासदार आणि आमदारांनाही पंतप्रधान किसान योजनेचा लाभ मिळत नाही. आतापर्यंत देशातील 11.82 कोटी शेतकर्‍यांना या योजनेचा लाभ मिळाला आहे. केंद्र सरकारने असे म्हटले आहे की वार्षिक 6 हजार रुपये त्याच शेतकर्‍यांच्या खात्यात वर्ग केले जातील, ज्याच्या नावावर शेती असेल.

मोदी सरकारची यशस्वी योजना

मोदी सरकारने शेतकऱ्यांचं उत्पन्न 2022 पर्यंत दुप्पट करण्याचा निर्णय घेतला होता. त्या निर्णयानुसार पीएम किसान सन्मान योजना सुरु करण्यात आली होती. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात दरवर्षी सहा हजार रुपये पाठवले जातात. शेतकरी संघटनेचे नेत्यांनी ही मदत वाढवून वार्षिक 24000 करावी अशी मागणी केली आहे.

Maharashtra14 News

Recent Posts

तुमच्या इथे कोणाविरुद्ध कोण? जाणून घ्या, … पहा, महाराष्ट्रातील सर्व 48 मतदारसंघातील उमेदवारांची यादी!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०२ मे) : महाराष्ट्रातील 48 जागांपैकी 47 जागांवरील लढती कशा असतील हे…

2 days ago

अंध दिव्यांग नागरिकांना ब्रेल लिपीतील व्होटर स्लिपचे वाटप

महाराष्ट्र14 न्यूज, (दि.०२ मे) : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ अंतर्गत २०५ चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये मा.निवडणूक…

2 days ago

दिवांकुर संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप व आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०१ मे) : दिवांकुर संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप…

3 days ago

‘जर तुम्ही माझ्या बाबतीत काही चूक केली, तर पुन्हा माझ्याकडे पायरी चढायची नाही … नेत्याने दिला कार्यकर्त्याना दम

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२८ एप्रिल) : उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत.. बारामती तालुक्यातील…

6 days ago

महायुतीच्या विजयासाठी भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांचा शहरात बैठकांचा धडाका पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपच्या १०० हून अधिक नमो संवाद सभा

महाराष्ट्र 24 न्यूज, दि.२५ एप्रिल : मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजपा-राष्ट्रवादी-आरपीआय-मनसे-रासपा व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार श्रीरंगआप्पा…

1 week ago