Google Ad
Agriculture News Editor Choice

Dehu : पिंपरी चिंचवडजवळील देहूगावातील सांगुर्डी येथे … मेंढ्यांच्या कळपावर वीज पडून आठ गाभण मेंढ्यांचा मृत्यू 

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.३१मे) : पिंपरी चिंचवड जवळच्या देहूगावामधील सांगुर्डी येथे एक दुर्दैवी घटना घडली आहे. काल झालेल्या विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसामध्ये तेथील एका मेंढ्यांच्या कळपावर वीज पडून ८ गाभण मेंढ्यां मृत्युमुखी पडल्या आहेत. तर १५ ते १६ मेंढ्या जखमी झाल्या आहेत. ही घटना सायंकाळी ७ च्या दरम्यान घडली आहे.

सांगुर्डी येथील अमृता कर्हे यांच्या त्या मेंढ्या आहेत. या दुर्दैवी घटनेमध्ये जवळपास दोन लाखांचे नुकसान झाले आहे. या घटनेबाबत माहिती समजताच सांगुर्डी गावचे पोलीस पाटील सोनम काळे, गावचे सरपंच वसंत भसे, कृष्णा भसे, नारायण मराठे, संतोष भोसले, सुदाम भसे, गोविंद भसे,गणेश भसे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली.

Google Ad

तसेच सर्वानी अमृता कर्हे यांना धीर दिला आहे. या दरम्यान, सांगुर्डे गावचे सरपंच वसंत भसे यांनी संबंधित अमृता कर्हे यांच्या मृत मेंढ्यांचा पंचनामा करुन नुकसान भरपाई देण्याची मागणी देखील केली आहे.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

8 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!