Google Ad
Editor Choice

सांगावीत रंगला ‘आपल्या कुटूंबाचा आनंदमेळा’ … ” दीप – उत्सव आपल्या मनामनांचा सोहळा आपल्या कुटुंबाचा” … प्रशांत शितोळे मित्र परिवाराच्या वतीने नियोजनबद्द आयोजन

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि. ३० ऑक्टोबर) : दीपावलीच्या मंगलमय पर्वाच्या निमित्ताने समाजातील विविध घटकांमध्ये स्नेहाचे बंध निर्माण व्हावेत आणि परस्पर संवाद वाढीस लागावा, यासाठी माजी नगरसेवक प्रशांत शितोळे, उज्वला ढोरे, सुषमा तनपुरे , पंकज कांबळे मित्र परिवाराच्या पुढाकाराने ” दीप – उत्सव आपल्या मनामनांचा सोहळा आपल्या कुटुंबाचा” हा दिवाळी फराळ स्नेहमिलन कार्यक्रम सांगवी येथे झाला.

माजी नगरसेवक प्रशांत शितोळे हे अनेक वर्षापासून दिवाळी फराळ कार्यक्रमाच्या निमित्ताने कार्यकर्त्यासह हितचिंतक, मित्रपरिवार यांना आमंत्रित करून त्यांच्याशी असणारे ऋणानुबंध आणखी द्विगुणित करण्याचा प्रयत्न करतात. अशा प्रकारचा त्यांचा हा उपक्रम निश्चितच कौतुकास्पद आहे.

Google Ad

दिनांक ३० ऑक्टोबर रोजी रविवारी दिपावली निमित्ताने दरवर्षी प्रमाणे पिंपरी चिंचवड शहरराष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष व माजी नगरसेवक प्रशांत शितोळे, उज्वला ढोरे, सुषमा तनपुरे , पंकज कांबळे यांनी जुनी सांगवीतील गजानन महाराज मंदिरा समोरील प्रांगणात फुलांनी सजवलेले तसेच दिव्यांची थीम असणारे विविध प्रकारचे डेकोरेशन करून येथे मित्रपरिवार, कार्यकर्ते आणि सांगवीकर नागरिक यांसह दिवाळी फराळ कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

यावेळी सुमधुर गीतांच्या रंगात , दिव्यांच्या मंद प्रकाशातआणि फुलांनी सजवलेल्या हत्ती, नांगर-बैलजोडी, फुलांचे मंदिर , फिरते आकर्षक दिवे यांच्या सोबत महिला आपला सेल्फी घेण्याची मजा लुटताना पहायला मिळाले. या कार्यक्रमात आकर्षक ठरला तो ‘सरकारवाडा’ आणि दिव्यांची रोषणाई

“दीप – उत्सव आपल्या मनामनांचा सोहळा आपल्या कुटुंबाचा” ही संकल्पना आमच्या सर्व मित्र परिवाराची होती, सांगवी हे एक आपले कुटुंब आहे, त्या कुटुंबातील सर्वांची सहकार्याची आठवण म्हणून अशा या कौटुंबिक दिवाळी फराळाचे आयोजन करण्याचा मूळ हेतू असतो, असे प्रशांत शितोळे यांनी सांगितले.

सांगवी येथे सायंकाळी ०६ ते १० वाजेपर्यंत चाललेल्या या सोहळ्याचे माजी नगरसेवक प्रशांत शितोळे, उज्वला ढोरे, सुषमा तनपुरे , पंकज कांबळे आणि मित्र परिवाराच्या वतीने या आयोजन करण्यात आले होते. सांगवी येथे झालेल्या या मेळाव्याला आजी-माजी लोकप्रतिनिधींसह विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी सांगवीतील नागरिक, कार्यकर्ते, मित्रपरिवार आणि महिलांनी यावेळी हजेरी लावली होती.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!