Google Ad
Editor Choice

पुण्यातील छत्रपती संभाजी महाराज पुलावरील मेट्रोच्या गर्डरच्या उंची बाबतच्या विषयाबाबत येत्या ८ दिवसांत निर्णय … काय होता, अडथळा, वाचा सविस्तर …

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१५ऑक्टोबर) : पुण्याच्या वैभवशाली गणेशोत्सव मंडळाच्या गणपतीची मिरवणूक छत्रपती संभाजी महाराज पुलावरुन जाते. पुलावरून जाणाऱ्या पुणे मेट्रोच्या गर्डरमुळे गणेशोत्सव विसर्जन मिरवणूक खंडोजीबाब चौकाकडे जाण्यास अडचण निर्माण होईल, असा आक्षेप मंडळांनी घेतला होता

महापौर मुरलीधर मोहोळ यांनी तातडीने थांबवण्याचे आदेश दिले होते. यानंतर मेट्रो, गणेशोत्सव मंडळ प्रतिनिधी आणि महापालिका प्रशासन यांची बैठक घेतली जाईल असे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले होते.

Google Ad

त्यानुसार महापौर निवास येथे संयुक्त बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी गणेशोत्सव मंडळांनी उपस्थित केलेल्या छत्रपती संभाजी महाराज पुलावरील मेट्रोच्या गर्डरच्या उंची बाबतच्या विषयाबाबत येत्या 8 दिवसांत निर्णय घेण्यात येणार असून या कामाबाबत मध्यममार्ग काढण्यावर एकमत झाल्याची माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली. या बैठकिला उपमहापौर सुनीता वाडेकर, महामेट्रोचे महाव्यवस्थापक ब्रिजेश दिक्षित, सभागृह नेते गणेश बिडकर, काँग्रेस गट नते आबा बागुल गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

पुण्यातील गणेशोत्सव हा समाजभान जपणारा उत्सव म्हणून जगभर ओळखला जातो. या विषयातही समाजभान जपत याबाबत मध्यम मार्ग काढण्याच्या निर्णयाला गणेशोत्सव मंडळांच्या प्रतिनिधींनी एकमताने पाठिंबा दिला आहे. त्यामुळे याबाबत विलंब न करता येत्या आठ दिवसांत याबाबतचा निर्णय घेण्यात येणार आहे.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

3 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!