Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

पिंपरी चिंचवड मधील मिळकत धारकांना अनादर (चेक बाऊन्स) झालेल्या धनादेशांबाबत १५ जून पर्यंत मुदत … नाहीतर होणार फौजदारी गुन्ह्या सारखी कठोर कारवाई!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि२५ मे) : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील मिळकतीची करसंकलन विभागामार्फत कर आकारणी करून मिळकतकर वसूल करण्यात येतो सदरचा मिळकतकर रोख धनादेश डी.डी. आर.टी.जी.एस. एन.एफ.टी. यु.पी. आय . ई.डी.सी. इ . पद्धतीने स्विकारण्यात येतो .

करआकारणी व करसंकलन विभागामार्फत सन २०२०-२०२१ चे अंदाजपत्रकीय मिळकतकर वसुलीचे उद्दिष्ट ८७० कोटी ठरवून दिलेले होते.सदरचे उद्दिष्ट पूर्ण करणेसाठी माहे जानेवारी २०२१ ते मार्च २०२१ , या कालावधीत विविध सवलत योजनासह वसुलीची मोहीम राबविण्यात आलेली होती . सदर कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणात मिळकत धारकांकडे वसुलीकामी जप्तीची मोहीम राबविण्यात आल्याने जप्ती पूर्वी व जप्ती नंतर बरेच मिळकत धारकांनी या कार्यालयास धनादेशाद्वारे मिळकतकर भरलेला आहे .

Google Ad

परंतु तदनंतर सदर भरलेले धनादेश मोठ्या प्रमाणात अनादर झालेले आहे . त्यामुळे मिळकत धारकांकडे मिळकतकराची थकबाकी जास्त प्रमाणात आहे. सदरील रक्कम महानगरपालिकेकडे येणे प्रलंबित आहे . अशा सर्व मिळकत धारकांकडे सदरील अनादर धनादेशांची रक्कम भरणेकामी या कार्यालयाकडून नोटीस बजावली असून पाठपुरावा करणेत येत आहेत . तरी देखील मिळकतधारक सदर धनादेशाची रक्कम महानगरपालिकेमध्ये भरणा करत नाहीत .

तरी ज्या मिळकतधारकांचे धनादेश अनादर झालेले आहेत यांना पिंपरी चिंचवड मनपाकडून विनम्र आवाहन करणेत येत आहे की , अनादर धनादेशाची संपूर्ण रक्कम करसंकलन विभागीय कार्यालयात दि . १५/०६/२०२१ पूर्वी भरावी , अन्यथा सदर अनादर झालेल्या धनादेशांबाबत आपणावर फौजदारी गुन्हा सारख्या कठोर कारवाईस सामोरे जावे लागेल याची कृपया दखल घ्यावी . असे (उप आयुक्त , करसंकलन ) पिंपरी चिंचवड महानगरपालिका पिंपरी यांनी कळविले आहे.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

72 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!