Google Ad
Editor Choice

पिंपरी चिंचवड मनपाच्या दवाखाने आणि रुग्णालयांमार्फत आरोग्य सेवा घेणा-या नागरिकांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ … नागरिकांना मिळतात या वैद्यकीय सेवा

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.११ नोव्हेंबर) :पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमार्फत नागरिकांच्या आरोग्य सेवेकरीता एकुण ०८ रुग्णालये व २९ दवाखाने सुरु करण्यात आलेले आहेत. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे कै.यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय हे ७६० बेड्सचे मल्टिस्पेशालिटी रुग्णालय असुन सदर रुग्णालयामध्ये येणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक असल्यामुळे पिं.चिं.मनपा मार्फत कोविड महामारी दरम्यान नवीन थेरगाव रुग्णालय (२०० बेड्स), ह.भ.प. कै.प्रभाकर मल्हारराव कुटे – आकुर्डी रुग्णालय (१३० बेड्स), नवीन जिजामाता रुग्णालय (१२० बेड्स) व नवीन भोसरी रुग्णालय (१०० बेड्स) कार्यान्वीत करण्यात आले.

सदरचे चारही रुग्णालये माहे जुन २०२१ पासुन कोविड १९ सोबतच इतर सर्व आरोग्य सेवांकरीता नागरिकांकरीता पुर्ण क्षमतेने सुरु करण्यात आले असुन सदर रुग्णालयांमार्फत आरोग्य सेवा घेणा-या नागरिकांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे दिसुन येत आहे.

Google Ad

▶️त्याचा तपशील खालील प्रमाणे :-


सदर सेवांसोबतच या रुग्णालयांमध्ये रक्ततपासणी, एक्स-रे, सोनोग्राफी, किरकोळ व मोठ्या शस्त्रक्रिया, विशेष व अतिविशेष बाह्यरुग्ण विभाग, अतिदक्षता विभाग इत्यादी सेवा देखिल पुरविल्या जात आहेत. यामुळे कै.यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयावरील ताण कमी होत असताना दिसून येत आहे. तरी नागरिकांनी सदर सेवांचा लाभ घ्यावा असे अवाहन वैद्यकिय विभाग, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमार्फत करण्यात येत आहे.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!