Google Ad
Editor Choice

दत्तजयंती सोहळ्यानिमित्त कासारवाडीतील श्रीदत्तसाई सेवा कुंज आश्रम भाविकांच्या मांदियाळीने फुलला

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि १८ डिसेंबर) : कासारवाडी येथील श्रीदत्तसाई सेवा कुंज आश्रम मंदिरात दत्त जन्माचे किर्तन हरिभक्त परायण कैलास महाराज खंडागळे यांनी केले. नेवासा उतार करण्यासाठी दत्तात्रयांनी अवतार धारण केला. यावेळी दत्त जन्माचा महिमा महाराजांनी आपल्या वाणीतून वर्णन केला.

मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावर सायंकाळी दत्ताचा जन्म झाला. म्हणून त्या दिवशी दत्ताचा जन्मोत्सव साजरा केला जातो. पौराणिक कथेनुसार, पूर्वीच्या काळी भूतलावर स्थूल व सूक्ष्म रूपांत आसुरी शक्ती मोठ्या प्रमाणावर वाढल्या होत्या. त्यामुळे देवगणांनी त्या आसुरी शक्‍तींना नष्ट करण्यासाठी केलेले प्रयत्न असफल झाले. तेव्हा ब्रह्मदेवाच्या आदेशानुसार वेगवेगळया ठिकाणी वेगवेगळया रूपांत दत्त देवतेला अवतार घ्यावा लागला. त्यानंतर दैत्य नष्ट झाले. तो दिवस ‘दत्तजयंती’ म्हणून साजरा करतात.

Google Ad

कासारवाडी दत्त मंदिरातील मंडपात दुपारी निवृत्ती घाणेकर गुरुजी व सहकाऱ्यांनी दत्तप्रभुची भक्ती गीते गायन केली. यावेळी श्रीदत्त जन्मोत्सवा निमित्ताने भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. भाविकांसाठी दत्त जन्मानंतर महाप्रसादाचे आयोजन केले होते. दत्त प्रभूंच्या चरणी नतमस्तक होत हजारो भक्तांनी दत्त दर्शनाचा लाभ घेतला. पौर्णिमा व दत्तजयंतीच्या निमित्ताने कासारवाडीत भक्ती व भक्तांचा महापुर यावेळी दिसून आला. दत्तनामाच्या जयघोषाने मंदिर परिसर दुमदुमुन गेला. मंडपात श्री दत्तजयंतीनिमित्त पाळण्याचा कार्यक्रम व गुलालाची फुलांची उधळण करीत जन्मोत्सव साजरा करण्यात आला.

या सप्ताहाच्या निमित्ताने आमदार लक्ष्मण जगताप मित्र परिवार यांच्या वतीने पत्रकार बंधू-भगिनींचा तसेच डॉक्टरांचा शाल-श्रीफळ सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. शिवानंद स्वामी यांनी प्रास्ताविक केले तर सुत्रसंचालन प्रा.संपत गर्जे व श्रीकांत चौगुले यांनी केले.

यावेळी चिंचवड विधानसभेचे आमदार लक्ष्मणभाऊ जगताप, सुभाषदादा काटे, माऊली जगताप, करंजुले नाना, विजयशेठ जगताप, मा.नगरसेवक शंकरशेठ जगताप, सुनील येडे, विलास काटे, बाबासाहेब बागल, पोपटराव शिवले, बाळासाहेब जाधव, विशाल गुंडगळ, उज्वला गावडे तसेच भावीकभक्त उपस्थित होते.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!