Google Ad
Editor Choice

भोसरी येथीलनारायण हट शिक्षण संस्थेच्या प्री- प्रायमरी शाळेत “दर्श अमावास्या”/”दीप पूजन”उत्साहात साजरी!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२८ जुलै) : भोसरी येथीलनारायण हट शिक्षण संस्थेच्या प्री- प्रायमरी शाळेत “दर्श अमावास्या”/”दीप पूजन”उत्साहात साजरी करण्यात आली. विद्यार्थ्यांमध्ये भारतीय संस्कृतीची, परंपरेची ओळख व्हावी, त्यांच्यामध्ये मूल्यांची रुजवणूक व्हावी, सृजनशीलता निर्माण व्हावी.या उद्देशाने “दीप पूजन”कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

गुरुवार दिनांक २८ जुलै २०२२ रोजी भारतीय दिनदर्शिकेनुसार दर्श अमावास्या आहे. आणि त्याचबरोबर दीप- पुजा साजरा करण्याचे महत्व अधिक आहे. दीप -पुजा करणे म्हणजे दिवे पेटवून दिपोत्सव साजरा करणे होय. दिवे प्रज्वलित करून त्याची कृतज्ञापूर्वक पुजा करणे. श्रावण मासाच्या पूर्व संध्येचीसुंदर ओळख आपल्यासंस्कृतीने करून दिली आहे. ती म्हणजे “दीपा अमावस्या” तिलाच आपण “दिव्यांची आवस” असे म्हणतो..!

Google Ad

“दीप पूजन”कार्यक्रमाचे औंचित्य साधून नारायण हट शिक्षण संस्थेच्या प्री- प्रायमरी शाळेमध्ये मातीचे, पिठापासून बनवलेले, दिवे/पोस्टर्स शाळेतील विद्यार्थ्यांनी स्वतः बनवून व काही रेडिमेड घरून सजवून आणले होते. (याच्यातून मुलांमधील कलाकृतींच्या विकासाला संधी मिळण्यास मदत झाली.)हेसर्व दिवे प्रज्वलीत करून. गंध, फुले व अक्षता वाहुन आणि त्यांच्या प्रति सामूहिक प्रार्थना करुन आमच्या जीवनातील अज्ञानरूपी अंधःकार नष्ट होऊ दे! दिवा म्हणजे पंचमहाभूतांमधील अग्नी देव असतो. एक मांगल्याचे प्रतीक म्हणून दिव्यांना अनन्यसाधारण महत्व आहे. हे शिक्षकांनी विद्यार्थ्यांना पटवून दिले. तो भाव व्यक्त करताना खालीलप्रमाणे श्लोक शिक्षकांनी विद्यार्थ्यांन कडून म्हणून घेतली….

शुभं करोति कल्याणम् आरोग्यं धनसंपदा । शत्रुबुद्धी विनाशाय दिपं ज्योती नमोस्तुते!

कार्यक्रमाचे संयोजन नारायण हट शिक्षण संस्थेच्या प्री- प्रायमरी शाळेच्या प्राचार्य, विजया चौगुले, सौ. सायली संत, सौ. मीनल बागुल, सौ. प्रतिभा तांबे, सौ‌. भाग्यश्री नगरकर, सुरेखाताई मुके, श्री. प्रवीण भाकड, यांनी केले. या कार्यक्रमाचा आनंद नारायण हट सोसायटीमधील सभासद, विद्यार्थ्यांचे पालक व सर्वसामान्य नागरिकांनी घेतला.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!