महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१३ सप्टेंबर) : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या वतीने दापोडी फुगेवाडी गोरगरीब हातावर पोट असलेल्या भाजीविक्रेते व किरकोळ व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांवर सर्रासपणे कारवाई केली जाते पोट तिडकीने उभा केलेल्या दुकानांची हातगाडींची तोडमोड करून त्यांच्या गाड्या भरल्या जातात. आपणास जर कारवाईज करायची असेल तर प्रथम त्या व्यवसायिकांना विक्रेत्यांना हाॅकर्स झोनची निर्मिती करून द्यावी जेणेकरून त्या ठिकाणी ते आपला उदरनिर्वाह चालू करतील व गोरगरीब सर्वसामान्य घरातील हातावर पोट असलेल्या जनतेचा उदरनिर्वाह चालेल तरी सदर प्रकरणात आपन जातीने लक्ष घालून त्या व्यवसायिकांचा प्रश्न मार्गी लावावा .
नंतरच कारवाई करणे सुरू करावी असे निवेदन पिंपरी युवासेना व मैत्री ग्रुप च्या वतीने ह प्रभाग क्षेत्रीय अधिकारी श्री ढाकणे साहेब यांना देण्यात आले. ह्या वेळेस पिंपरी युवा अधिकारी निलेश हाके मैत्री ग्रुप चे रवि (भाऊ) कांबळे, संदेश (भाऊ) बोरडे,शुभांगी मोरे,जयसिंग आप्पाकाटे,लक्ष्मी बंडारे,शोकत शेख,मंगेश नवगणे,सचिन काटे (भेळ वाला)आनंद अगरवाल, ईशांत अगरवाल,जुबेर शेख हे उपस्थित होते.