Categories: Editor Choice

Sangola : खतरनाक … पूर्ववैमनस्यातून तलवारीने वार पिता ठार , पुत्र गंभीर जखमी

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१७ ऑक्टोबर) : पूर्व वैमनस्यातून ९ जणांनी मिळून जीपची काच फोडली. त्यानंतर दोघांना गाडीतून बाहेर काढून नऊ जणांनी मिळून दोघांवर तलवारीने वार केले.

त्यात पित्याचा मृत्यू झाला तर मुलगा गंभीर जखमी झाला आहे. ही घटना शनिवारी रात्री उशिरा घडली. मात्र रविवारी सायंकाळी चार वाजता याबाबतचा गुन्हा सांगोला पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.द रम्यान, ही घटन रात्री ८ च्या सुमारास जवळा ते घेरडी (ता सांगोला) जाणारे रोडवरील गावडेवाडी ओढ्यानजीक घडली.

गंगाराम संतु गावडे (६५) असे मृताचे नाव आहे तर विजय गंगाराम गावडे (३२) असे जखमी मुलाचे नाव आहे.या बाबत जखमी विजय गंगाराम गावडे यांनी फिर्याद दिली असून पोलिसांनी सुरेश मुत्त्याप्पा खांडेकर, अंकुश कड्याप्पा खांडेकर, राजू मुत्त्याप्पा खांडेकर, शाहूबा बापू खांडेकर,आनंदा मुत्याप्पा खांडेकर, बाबा बिरा लवटे, तातोबा खांडेकर, बापू तातोबा खांडेकर (सर्वजण रा.गावडेवाडी ता. सांगोला) यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील, पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णीयां च्यासह अन्य पोलीस कर्मचाऱ्यांनी भेट देऊन जखमी विजय गावडे यांच्याकडून घटनेची माहिती घेतली.

Maharashtra14 News

Recent Posts

तुमच्या इथे कोणाविरुद्ध कोण? जाणून घ्या, … पहा, महाराष्ट्रातील सर्व 48 मतदारसंघातील उमेदवारांची यादी!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०२ मे) : महाराष्ट्रातील 48 जागांपैकी 47 जागांवरील लढती कशा असतील हे…

17 hours ago

अंध दिव्यांग नागरिकांना ब्रेल लिपीतील व्होटर स्लिपचे वाटप

महाराष्ट्र14 न्यूज, (दि.०२ मे) : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ अंतर्गत २०५ चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये मा.निवडणूक…

1 day ago

दिवांकुर संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप व आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०१ मे) : दिवांकुर संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप…

2 days ago

‘जर तुम्ही माझ्या बाबतीत काही चूक केली, तर पुन्हा माझ्याकडे पायरी चढायची नाही … नेत्याने दिला कार्यकर्त्याना दम

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२८ एप्रिल) : उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत.. बारामती तालुक्यातील…

5 days ago

महायुतीच्या विजयासाठी भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांचा शहरात बैठकांचा धडाका पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपच्या १०० हून अधिक नमो संवाद सभा

महाराष्ट्र 24 न्यूज, दि.२५ एप्रिल : मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजपा-राष्ट्रवादी-आरपीआय-मनसे-रासपा व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार श्रीरंगआप्पा…

1 week ago