Google Ad
Editor Choice

महाराष्ट्रात ‘ या ‘ वेळेत पुन्हा संचारबंदी ?, केद्रानं दिल्यात स्पष्ट सूचना

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२७ ऑगस्ट) : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची भीती व्यक्त केली जात असताना केंद्र सरकारने राज्यांना केलेल्या सूचनांमुळे पुन्हा एकदा कोरोनाचं सावट अधोरेखीत झालं आहे. महाराष्ट्र तसेच केरळमधील कोरोनाच्या सद्यस्थितीबद्दल केंद्रीय गृहमंत्रालयाने चिंता व्यक्त केली आहे.

यासंदर्भात केंद्राने काही सूचना देखील केल्या आहेत, त्यामुळे महाराष्ट्रावर पुन्हा एकदा संचारबंदी लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Google Ad

केरळमध्ये सध्या सर्वाधिक दैनंदिन कोरोना रुग्ण सापडत आहेत, त्या खालोखाल महाराष्ट्राचा क्रमांक लागतो. त्यामुळे जास्त संसर्गदर असलेल्या भागात रात्रीची संचारबंदी लागू करण्याची सूचना केंद्र सरकारने राज्यांना केली आहे. महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्या पुन्हा डोकं वर काढत असल्याचं दिसत आहे, त्या पार्श्वभूमीवर केंद्रानं केलेली सूचना अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.
केरळमध्ये सलग दोन दिवस 30 हजारांहून अधिक कोरोना रुग्ण वाढले आहेत, तर 1 लाख रुग्ण उपचार घेत आहेत. देशातील 41 जिल्ह्यांमध्ये 10 टक्क्यांपेक्षा जास्त संसर्गदर आहे. केरळ आणि महाराष्ट्रात उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या सर्वाधिक असल्याने केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे राज्यातील परिस्थितीचा आढावा घेतला.

कोरोना नियमांचे पालन केले जात नसल्याने कोरोनाचा प्रसार वाढत असल्याची माहिती भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचे महासंचालक बलराम भार्गव यांनी दिली. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केरळ आणि महाराष्ट्राने अधिक प्रभावीपणे प्रतिबंधात्मक उपाय योजण्याची गरज असल्याचं केंद्रीय गृह मंत्रालयाने सांगितलं आहे. त्या पार्श्वभूमीवर जास्त संसर्गदर असलेल्या भागांमध्ये रात्रीची संचारबंदी लागू करावी, अशा स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे कोरोनाचा जास्त प्रभाव असलेल्या महाराष्ट्रातील भागात रात्रीची संचारबंदी लावली जाणार का? हे पाहावं लागेल.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

151 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!