Google Ad
Editor Choice

राज्यात Delta Plus चे संकट वाढले , आणखी 10 रुग्ण आढळले , नवी माहिती आली समोर !

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१६ऑगस्ट) : कोरोनाची लाट (COVID-19) ओसरल्यामुळे जवळपास सर्व निर्बंध शिथिल करण्यात आले आहे. तर दुसरीकडे डेल्टा प्लसचे (Delta Plus) संकट दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. राज्यात आणखी डेल्टा प्लसचे 10 रुग्ण आढळले आहे. रुग्णांची संख्या ही 76 वर पोहोचली आहे. डेल्टा प्लसबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. राज्यात आणखी 10 रुग्ण आढलले असून सगळ्यात जास्त रुग्ण हे कोल्हापूरमध्ये आढळले आहे. कोल्हापुरात रुग्ण संख्या 6, रत्नागिरी 3 तर 1 सिंधुदुर्गात रुग्ण आढळला आहे.

आता डेल्टा प्लस बाधित रुग्णांची राज्यातील संख्या 76 इतकी झाली आहे. 76 पैकी 37 पुरुष आणि 39 स्त्रियांचा समावेश आहे. बाधितांमध्ये महिलांचे प्रमाण जास्त आहे. तर आतापर्यंत डेल्टा प्लसमुळे आतापर्यंत ५ जणांचा मृत्यू झाला आहे. यात ३ पुरुष आणि २ स्रियांचा समावेश आहे. तीन दिवसांपूर्वी आणखी 10 रुग्ण आढळले होते.

Google Ad

विशेष म्हणजे, कोरोनाची लाट रोखण्यासाठी लसीकरणावर जास्त भर दिला जात आहे. पण, डेल्टा प्लस व्हेरिएंटमध्ये लशीचे दोन्ही डोस घेतलेले 10 जण आढळले आहे. लस घेतलेल्या 10 रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहे. काय आहे डेल्टा प्लस कोरोना? डेल्टा प्लस हा डेल्टा किंवा ‘बी1.617.2′ याचंच रौद्र रुप आहे. हा व्हेरियंट पहिल्यांदा भारतातच आढळला होता आणि कोरोनाच्या दुसऱ्या लाटेसाठी हाच जबाबदार होता.

व्हायरसच्या या नव्या प्रकारामुळे कोरोना किती घातक होऊ शकतो, याचा अंदाज अद्याप लावता आलेला नाही. भारतात नुकतंच मोनोक्लोनल अँटीबॉडी कॉकटेल उपचार पद्धतीला परवानगी मिळाली आहे. मात्र, ही पद्धतचही डेल्टा प्लसपुढे निष्प्रभ ठरत असल्याचं म्हटलं जात आहे.

दिल्लीतील सीएसआयआर- इन्स्टिट्युट ऑफ जीनोमिक्स अँड इंटिग्रेटिव्ह बायोलॉजीचे (IGIB) शास्रज्ञ विनोद स्कारिया यांनी रविवारी याबद्दल ट्विट केलं होतं. त्यांनी लिहिलं होतं,’ हे म्युटेशन स्पाईक प्रोटीन SARS-CoV-2 मध्ये म्युटेशन झाल्यामुळे माणसाच्या शरीरातील पेशींमध्ये तो प्रवेश करू शकतो. सध्या भारतात K417N ची व्हेरिएंट फ्रीक्वेन्सी फार नाही. हे सिक्वेन्सेस प्रामुख्याने युरोप, आशिया आणि अमेरिकामध्ये सापडले आहेत.’ या वर्षी मार्चमध्ये पहिला सिक्वेन्स युरोपमध्ये सापडला होता

Google Ad

About the author

Maharashtra14 News

6 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!