महाराष्ट्र 14 न्यूज : शिवीगाळ केल्याने नोकराने लोखंडी रॉडने डोक्यावर वार करून ढाबामालकाची हत्या केली. ही थरारक घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली. हिंगणा पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून मारेकरी नोकराला रविनगर परिसरात अटक केली.
प्रवीण यांचा मोहगाव झिल्पी मार्गावर तंदुरी नावाचा ढाबा आहे. येथे निखिल हा नोकर आहे. प्रवीण हे सतत निखिलला शिविगाळ करायचे, असे सांगितले जाते. त्यामुळे तो संतापला. शुक्रवारी रात्री प्रवीण व निखिल या दोघांनी जेवण केले. यादरम्यान प्रवीण यांनी निखिलला शिवीगाळ केली. निखिलने लोखंडी रॉडने प्रवीण यांच्या डोक्यावर वार केले. यात प्रवीण यांचा मृत्यू झाला. निखिल हा पसार झाला. शनिवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. माहिती मिळताच हिंगणा पोलिसांचा ताफा तेथे पोहोचला. निखिल पसार असल्याने पोलिसांना संशय आला. पोलिसांनी शोध घेऊन निखिलला रविनगर चौकात अटक केली. शिवीगाळ केल्याने प्रवीण यांची हत्या केल्याचे निखिलने पोलिसांना सांगितले.
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०२ मे) : महाराष्ट्रातील 48 जागांपैकी 47 जागांवरील लढती कशा असतील हे…
महाराष्ट्र14 न्यूज, (दि.०२ मे) : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ अंतर्गत २०५ चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये मा.निवडणूक…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०१ मे) : दिवांकुर संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप…
महाराष्ट्र 14 न्यूज, दिनांक- १ मे २०२४. नवी सांगवी (समर्थनगर) येथील प्रतिभा महिला प्रतिष्ठान संचलित…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२८ एप्रिल) : उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत.. बारामती तालुक्यातील…
महाराष्ट्र 24 न्यूज, दि.२५ एप्रिल : मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजपा-राष्ट्रवादी-आरपीआय-मनसे-रासपा व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार श्रीरंगआप्पा…