महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०४जानेवारी) : सांगवी, नवी सांगवी, पिंपळे गुरव भागातील क्रिकेट प्रेमी गेली 10 ते 12 वर्षे सातत्याने क्रिकेट खेळणारे खेळाडू, आज मैदानावर न खेळता त्यांच्या लोकप्रिय आमदारांस श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी एकत्र आले. आपले लाडके भाऊ यापुढे आपला सामना पाहण्यासाठी नसणार … त्यामुळे यावेळी अनेकांना अश्रू अनावर झाल्याचे दिसत होते.
कला-क्रिडा क्षेत्राला नेहमीच लक्ष्मण भाऊंनी सहकार्य केले, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना पुर्ण महाराष्ट्र राज्यात सी एम चषक क्रिकेट स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. त्यावेळी भाऊंच्या मार्गदर्शनाखाली एकूण १८५ संघानी सहभाग घेतला जे पुर्ण महाराष्ट्र राज्यात उच्चांक होता, त्यावेळी त्यांची दखल सी एम ऑफीसने देखील घेतली होती.
तसेच दरवर्षी सांगवीच्या पी डब्लू डी मैदानावर भाऊंच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आमदार चषकांचे आयोजन होते, त्यामध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिका मधील अनेक खेळाडूंना प्राध्यान्य देऊन खेळण्याची संधी उपलब्ध करून देण्यात येते, हे सर्व खेळाडू आमदार चषकांचे गेली ८वर्ष आयोजन करत आहेत. यात किरण दहीवाळ, अजय दुधभाते, गणेश बनकर, राहुल ढोरे आदी क्रिकेटपटू उपस्थित होते.
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.17 जुलै : भोसरी (पुणे)- गाडी लोहार समाज उन्नती मंडळ , कल्याण…
गुरुजनांच्या सहवासाने रंगलेला सोहळा..!! महाराष्ट्र 14 न्यूज, दि.05 जुलै : गुरुजनांच्या प्रति प्रत्येकाच्या मनातून व्यक्त…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि. 26 जून) : महाराष्ट्राच्या वारकरी संप्रदायाला ज्या क्षणाची आस लागून असते,…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१८ जून) : महाराष्ट्राच्या वारकरी संप्रदायाला ज्या क्षणाची आस लागून असते, त्या…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१८ जून : जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचा ३४० वा पालखी प्रस्थान…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१५ जून : तळेगाव दाभाडे पोलिस स्टेशन हद्दीतील कुंडमळा (इंदुरी) येथील इंद्रायणी…