Google Ad
Uncategorized

डॉक्टरांची चिठ्ठी असेल तरच यापुढे मिळणार खोकल्याचं औषध ?

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०१ जुलै( : यापुढे खोकल्याचं औषध हवं असल्यास आपण औषधांच्या दुकानात जातो आणि औषधी द्रव्याची बाटली सहजपणे विकत घेऊन येतो. ही प्रथा बंद करण्याचा केंद्र सरकार विचार करत आहे. यापुढे डॉक्टरांची चिठ्ठी असेल तरच खोकल्याचं औषध दुकानातून मिळू शकेल अशी तरतूद करण्यात येण्याची शक्यता आहे.

केंद्र सरकारने स्थापन केलेल्या तज्ज्ञांच्या उपसमितीला या प्रस्तावाची व्यवहार्यता तपासण्यास सांगितले आहे.

Google Ad

औषधे तांत्रिक सल्लागार मंडळ हे देशातील औषधांसंदर्भातील सर्वोच्च सल्लागार मंडळ आहे. गेल्या महिन्यात या मंडळाची बैठक पार पडली. या मंडळाने नेमलेल्या समितीने खोकल्याच्या औषधासाठी डॉक्टरांच्या चिठ्ठी गरजेची आहे अथवा नाही या बाबत सल्ला देण्यास सांगितले आहे. हिंदुस्थानात बनवलेल्या काही खोकल्याच्या औषधांवर इतर देशांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. या औषधांचे सेवन केल्याने लहान मुलांचा मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.

खोकल्याच्या औषधाचा देशात गैरवापर केल्याचेही प्रकार घडले आहेत. काही खोकल्याची औषधे ही अंमली पदार्थ म्हणून वापरली जात असल्याचं अंमली पदार्थ विरोधी दलाने म्हटले होते. अंमली पदार्थ विरोधी दलाने औषध नियामक संचालकांकडे ‘कोडेन’युक्त खोकल्याच्या औषधांचे प्रमाणे लक्षणीयरित्या कमी करावे अशी विनंतीही केली होती. कोडेन युक्त खोकल्याची औषधे असलेल्या फेसीडील आणि कोरेक्सविरोधात अंमली पदार्थ विरोधी दलाने जप्तीची कारवाई केली आहे.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Ad

Advertisement 2

ad

Advertisement 3

ad

Advertisement

error: Content is protected !!