Google Ad
Editor Choice

पिंपरी चिंचवडचे नगरसेवक ‘शशिकांत कदम’ यांनी आपला वाढदिवस न करण्याचे कार्यकर्ते , हितचिंतक , स्नेहिजन आणि मित्र परिवारास केले आवाहन …

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.३१ जुलै) : राज्यावर आलेले महाभयंकर असे कोरोनाचे आणि आता आलेले पुराचे संकट यामुळे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे भाजपचे प्रभाग क्रमांक २९ चे नगरसेवक शशिकांतआप्पा कदम यांनी १९ ऑगस्ट रोजी असणारा त्यांचा वाढदिवस आपल्या कार्यकर्त्यांना आणि हितचिंतकाना साजरा न करता याऐवजी कोकणातील पूरग्रस्तांसाठी मदत द्यावी असे आवाहन केले आहे.

सध्या कोकणासह सातारा , सांगली, कोल्हापुर या ठीकाणच्या अतिवृष्ठी व महापुराने थैमान घातले असुन , या अतिवृष्ठीच्या तडाख्याने बाधीत पुरग्रस्तांना जिवनाश्यक वस्तुंची मदत करण्याचे आवाहन त्यांच्या वतीने करण्यात येत आहे.

Google Ad

शशिकांत कदम म्हणाले …

नगरसेवक शशिकांत कदम यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सर्व कार्यकर्ते , हितचिंतक , स्नेहिजन आणि मित्र परिवारास नम्र विनंती करण्यात येते की सांगली , सातारा , कोल्हापूर आणि कोकण परिसरातील पुरपरिस्थितीमुळे मी नगरसेवक शशिकांत ( आप्पा ) गणपत कदम माझा वाढदिवस न करण्याचे ठरविले आहे . कृपया पुष्पगुच्छ व भेटवस्तू ऐवजी आपण पूरग्रस्तांना मदत करून शुभेच्छा द्याव्या कृपया आपण गहू तांदूळ , खाद्य तेल , साखर , तूर डाळ आणि चहा पावडर यास्वरुपाची मदत करावी , आपली मदतीची इच्छा हीच माझ्या वाढदिवसाची शुभेच्छा.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

68 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!