Google Ad
Editor Choice Technology

Corona Vaccine : पुण्यात शेजारशेजारच्या ‘ या ‘ गावांमध्ये कोविशील्ड आणि कोवॅक्सिन लसीची निर्मिती

महाराष्ट्र 14 न्यूज : पुण्या जवळच्या मांजरी बुद्रुक गावामध्ये सिरम इन्स्टिट्यूट कडून कोविशील्ड लसीची निर्मिती होत असताना आता शेजारीच असलेल्या मांजरी खुर्द गावामध्ये भारत बायोटेकच्या कोवॅक्सीन लसीची देखील निर्मिती होणार आहे. येत्या तीन ते साडे तीन महिन्यांमध्ये भारत बायोटेककडून मांजरी खुर्द गावामध्ये कोरोना वरील लसीची निर्मिती सुरू करण्यात येणार आहे.

त्यानंतर लस निर्मितीचा वेग प्रतिमहिना दीड ते अडीच कोटी डोस इतका वाढवण्यात येणार आहे. 70 च्या दशकात मांजरी खुर्द गावातील वन विभागातील जागा लस निर्मितीसाठी इंटरनेट इंडिया या कंपनीला देण्यात आली.

Google Ad

पुण्याजवळील मांजरी बुद्रुकची ओळख आहे ती जगातील सर्वात मोठी लस उत्पादक कंपनी असलेल्या सिरम इन्स्टिट्यूटमुळे. सध्या तर या कंपनीकडे सगळ्या जगाचं लक्ष लागून आहे कारण कोरोनावरील कोव्हिशील्ड लसीची निर्मिती इथं होतेय. आता या मांजरी बुद्रुक गावाचं जुळं भावंड असलेल्या मांजरी खुर्द मध्ये भारत बायोटेक च्या कोवॅक्सीन लसीची निर्मिती देखील केली जाणार आहे.

1973 पासून इंटरनेट इंडिया कंपनीने या बारा एकर जागेमध्ये प्राण्यांच्या मधील वेगवेगळ्या आजारांर ती उपयोगी ठरणारी लस तयार करण्यास सुरुवात केली प्राण्यांना पायांना आणि तोंडाला होणाऱ्या आजारांवर उपयोगी ठरेल अशी लस या ठिकाणी तयार होत होती. मात्र त्यानंतर या कंपनीची मालकी भारत बायोटेक ची सहयोगी कंपनी असलेल्या भारत बायोटेक या कंपनीने विकत घेतली त्यानंतर भारत प्रायवेट आणि राज्य सरकार यांच्यामध्ये या बारा एकर जागेवरून वाद सुरू झाला.

राज्य सरकारने ही जागा स्वतःच्या ताब्यात घ्यायचं ठरवलं तर त्यानंतर प्रकरण न्यायालयामध्ये गेलं आणि मागील चार वर्ष या कंपनीचे काम थांबलं. मात्र आता कोरोनामुळे निर्माण झालेल्या आणीबाणीच्या परिस्थितीमध्ये या बारा एकर जागेमध्ये कोवॅक्सीन लसीची निर्मिती केली जाईल असं भारत बायोटेकने जाहीर केल्यानंतर राज्य सरकारच्या संमतीने ही जागा भारत बायोटेककडे सोवण्याचा निर्णय न्यायालयाने दिला. त्यानंतर पुण्याचे विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांनी मांजरी खुर्द गावातील या कंपनीला भेट दिली आणि लस निर्मितीची प्रक्रिया लवकरात लवकर सुरू व्हावी यासाठी आवश्यक त्या परवानग्या लगेच मंजूर केल्या.

▶️काही दिवसांतच सुरु होणार काम…

काही दिवसांमध्ये या ठिकाणी काम सुरू होईल असं पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी जाहीर केलं आहे. या कंपनीमध्ये लस निर्मिती करण्यासाठी आवश्यक असलेली यंत्रणा आणि मशिनरी आधीपासूनच तयार आहे. त्यामुळे भारत बायोटेक कंपनीला इथे फक्त स्कील्ड मॅनपॉवर आणावी लागणार आहे. जिथे ही लस निर्मिती होणार आहे तिथून 7 ते 8 किलोमीटर अंतरावरती मांजरी बुद्रुक गाव आहे जिथे सिरम इन्स्टिट्यूट कडून कोव्हीशील्ड लसीची निर्मिती केली जाते. त्यामुळे पुण्यानजीकच्या मांजरी बुद्रुक गावामध्ये कोव्हीशील्ड तर शेजारच्या मांजरी खुर्द गावामध्ये कोवॅक्सीन लसीची निर्मिती होणार आहे. कोरोनावर गुणकारी ठरणाऱ्या कोविशील्ड आणि कोवॅक्सीन लसीची निर्मिती अशाप्रकारे पुण्याजवळ असलेल्या दोन मांजरी गावांमध्ये शेजारी शेजारीच होणार आहे.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

246 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!