Google Ad
Editor Choice india

Delhi : कोरोना लशीची किंमत अखेर ठरली … जाणून घ्या किती रुपयांत मिळणार लस

महाराष्ट्र 14 न्यूज : देशात कोरोना लसीकरण मोहीम सुरू असून, आरोग्यसेवकांना पहिल्या टप्प्यात लस देण्यात येत आहे. आता लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरू होत आहे. सोमवारपासून (1मार्च) 60 वर्षांवरील नागरिक आणि विविध आजार असलेले 45 वर्षांवरील नागरिकांना कोरोना लस दिली जाणार आहे. सरकारी रुग्णालात ही लस मोफत तर खासगी रुग्णालयात सशुल्क देण्यात येणार आहे. यासाठी सरकारने लशीची किंमत 250 रुपये निश्चित केली आहे.

जगातील सर्वात मोठ्या कोरोना लसीकरणास 16 जानेवारीला देशात सुरवात झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या मोहिमेचे उद्घाटन झाले होते. केंद्र सरकारने लस देण्याचा प्राधान्यक्रम ठरवला आहे. यात आरोग्य कर्मचारी, कोरोनाच्या आघाडीवर लढणारे पोलीस, नागरी सुरक्षा कर्मचारी आणि स्वच्छता कर्मचारी यांचा समावेश आहे.

Google Ad

त्यानंतर ही लस 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना दिली जाणार आहे. तसेच, मधुमेह आणि उच्च रक्तदाबासह इतर आजार असलेल्या 45 वर्षांवरील रुग्णांचा यात समावेश असेल. सरकारी रुग्णालयात ही लस मोफत मिळेल मात्र, खासगी रुग्णालयात यासाठी 250 रुपये मोजावे लागतील. यात 100 रुपयांच्या सेवा शुल्काचा समावेश असेल, असे सरकारने जाहीर केले आहे.

अशी असेल नाव नोंदणीची प्रक्रिया

को-विन अॅपवर ऑनलाइन नोंदणी
– प्रत्यक्ष कोरोना लसीकरण स्थळीही नोंदणीची सोय
– 60 वर्षांवरील व्यक्तीला केवळ वयाचा पुरावा लागेल
– 60 वर्षांवरील व्यक्तींना ओळखीचा पुरावा म्हणून आधार कार्ड, वाहन चालण्याचा परवाना, मतदार ओळखपत्र, पासपोर्ट अथवा पॅन सादर करावे लागेल
– 45 ते 60 वयोगटातील व्यक्तींचा आजारपणाचे प्रमाणपत्र आवश्यक
– एका मोबाईल अॅपमधून चार जणांची नोंदणी शक्य
– आरोग्य सेतू अॅपच्या माध्यमातूनही नोंदणी करता येईल
– मोबाईल नसलेल्या ग्रामीण भागातील नागरिकांना 2.5 लाख सुविधा केंद्रे
– सुविधा केंद्राच्या माध्यमातून ग्रामीण भागातील नागरिक करु शकतात नोंदणी
– को-विन अॅपवरुन जवळचे लसीकरण केंद्रही शोधता येईल.

सिरम इन्स्टिट्यूट ही कोव्हिशिल्ड या कोरोना लशीचे उत्पादन करीत आहे. ही लस ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी आणि अॅस्ट्राझेन्का यांनी विकसित केली आहे. दुसरी लस ही भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन ही आहे. सध्या दोन कोरोना लशी उपलब्ध असून, आणखी सात कोरोना लशींवर काम सुरू असल्याचे सरकारने नुकतेच जाहीर केले होते. केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी ही माहिती दिली होते. प्रत्येक भारतीयाला ही लस देण्यासाठीही प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी जाहीर केले होते.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

1 Comment

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!