Google Ad
Uncategorized

Mumbai : राज्यात कोरोना रिटर्न! राज्यात कोरोनाच्या ३२८ नवीन रुग्णांचे निदान तर, मुंबईत ५१ वर्षीय महिलेचा मृत्यू

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.११ एप्रिल) : कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा वाढत असताना सोमवारी राज्यात ३२८ नवीन कोरोना रुग्णांचे निदान करण्यात आले. त्यात मुंबईतील ५१ वर्षीय महिलेच्या मृत्यूची नोंद झाली. तसेच २४७ रुग्ण बरे होऊन घरी गेले असल्याची माहिती राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने दिली आहे, तर मुंबईतही सोमवारी ९५ नवीन रुग्णांचे निदान झाले असून २८ रुग्णांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

५ रुग्णांना ऑक्सिजन बेड्सवर ठेवण्यात आले आहे. त्यामुळे सध्या मुंबईत १०२ रुग्ण विविध रुग्णालयात उपचार घेत असून, सध्या मुंबईतील सक्रिय रुग्णांची संख्या १४५४ इतकी असल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे देण्यात आली आहे.

Google Ad

गेल्या तीन वर्षांत उन्हाळ्यात मार्च-एप्रिलमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढल्याचे दिसून आले. हवामानातील बदल, विषाणूंचे बदलते स्वरूप, वाढीस पोषक वातावरण आदी कारणांमुळे संसर्ग वाढत असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. कोरोनाचा संभाव्य धोका लक्षात घेऊन आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. मास्क वापरण्याचे, लक्षणांकडे दुर्लक्ष न करण्याचे आवाहन केले जात आहे.

Google Ad

Featured

Advertisement 1

Ad

Advertisement 2

ad

Advertisement 3

ad

Advertisement

error: Content is protected !!