Google Ad
Editor Choice Health & Fitness

कोरोनाची नवी स्ट्रेन लहान मुलांमध्ये संसर्ग , पाहा मुलांमधील नेमकी लक्षणं काय ?

महाराष्ट्र 14 न्यूज : कोरोना महामारीच्या पहिल्या लाटेमध्ये सुरक्षीत असलेले लहान मुले आता कोरोनाच्या दुसऱ्या लाटीमुळे जास्त प्रभावित होत आहेत. यामुळे लहान मुलांचे आई वडील जास्त चिंतेत आहेत. भारतातील B.1.1.7 आणि B.1.617 या प्रकारचे व्हायरस विशेषत: 1 ते 16 वर्षे वयोगटातील मुलांसाठी जास्त धोकादायक आहेत. त्यामुळे खालील नमुद केलेले कोणतेही लक्षणे जर तुम्हाला दिसली, तर लगेच सावध व्हा.

ताप
ताप हा लहान मुलं आणि प्रौढांमधील कोविड -19 चे सर्वात सामान्य लक्षण आहे. थोडासा ताप हा तसा दुसऱ्या व्हायरलमुळे होण्याची शक्यता आहे. परंतु अशक्तपणा, थंडी वाजून येणे आणि सतत 5 दिवसांपेक्षा जास्त काळ ताप असणे अशी लक्षणे जर आढळली म्हणजे तुमच्या मुलाला कोरोना विषाणूची लागण झाली आहे. अशावेळी त्वरित विशेष काळजी घ्या.

Google Ad

पोटदुखी
जर आपल्या मुलाला सतत पोटात दुखत असेल, तर ते कोविडच्या गैस्ट्रोइंटेस्टाइनल लक्षणांमुळे होऊ शकते. यामध्ये सूज येणे, पोटात गोळा येणे किंवा पोटात जडपणा वाटणे अशी लक्षणे दिसतात. बर्‍याच मुलांना भूक न लागणे हे देखील एक लक्षण असू शकते, ज्याकडे आपण लक्ष दिले पाहिजे.

अतिसार
उलट्या होणे किंवा संडासला होणे ही या विषाणूची लक्षणे आहेत, जी अलीकडे बर्‍याच संसर्गीक रुग्णांमध्ये नोंदवले गेले आहे. याचा अर्थ असा होऊ शकतो की, व्हायरसने तुमच्या बाळाच्या पोटात असलेल्या ACE2 (एंजियोटेंसीन-कन्व्हर्टींग एन्झाइम) रिसेप्टर्ससोबत स्वतःला जोडण्यास सुरुवात केली आहे, ज्यामुळे या समस्या उद्भवतात.

सर्दी आणि खोकला
दररोज सर्दी आणि खोकला, असणे सामान्य नाही, कारण हे मुलांमध्ये अप्पर रेस्पीरेटरी नलिकांमध्ये संसर्ग झाल्याते एक लक्षण आहे. नोंदवल्या गेलेल्या केसेसमध्ये असे दिसून येते की, ही लक्षणे प्रौढांपेक्षा मुलांमध्ये अधिक सौम्य असतात. अगदी धाप लागणे किंवा छातीत दुखणे देखील मुलांमध्ये दिसून येते.

त्वचेवर पुरळ
कोविड -19 संक्रमित प्रौढांमध्ये त्वचेवर पुरळ उठणे हे लक्षण दिसून आले आहे. आता लहान मुलांमध्ये देखील हू लक्षणे आढळू लागली आहेत. त्वचेचे रंग बदलणे, पुरळ उठणे किंवा सुज येणे अशी त्वचेशी संबंधीत कोणतीही चिन्हे दिसली तर, हे देखील एक कोरोना लागण झाल्याचे चिन्ह असू शकते.

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!