पुणे करोनाने बेजार; रुग्णसंख्येने ओलांडला १ लाखाचा टप्पा

महाराष्ट्र 14 न्यूज : पुणे शहर आणि जिल्ह्यात गुरुवारी करोना संसर्गाचे २,९५५ नवीन रुग्ण आढळल्याने सुमारे चार महिन्यानंतर रुग्णसंख्येने एक लाखांचा आकडा ओलांडला आहे. शहरातील चाचण्यांनीही तीन लाखांचा टप्पा ओलांडला आहे. शहरात एका दिवसात १,१९६ रुग्णांना बरे वाटल्याने घरी सोडण्यात आले आहे. शहर आणि जिह्यातील रुग्णसंख्या एक लाख २६४वर पोहचली आहे. पैकी ७०,९०४ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामध्ये पुण्यातील ४३,६०६ रुग्णांचा समावेश आहे. पुण्यात १६,९७५ रुग्ण अद्याप उपचार घेत आहेत. शहरातील गंभीर रुग्णांची संख्या ६७४ असून, ४३५ रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. अतिदक्षता विभागात २४९ रुग्ण उपचार घेत आहेत. २,२७७ रुग्ण ऑक्सिजनवर आहेत.

शहर आणि जिल्ह्यात गुरुवारी ५९ जणांचा मृत्यू झाला असून, एकूण मृतांची संख्या २,२९०वर पोहचली आहे. जिल्ह्यात एकूण ४ लाख ७१ हजार ११६ चाचण्या झाल्या आहेत. त्यामध्ये पुण्यातील तीन लाख २,९४५ चाचण्यांचा समावेश आहे. गुरुवारी ५,२०८ चाचण्या घेण्यात आल्या.एकूण पॉझिटिव्ह : १,००,२६४ (पुणे शहर : ६२,०३७, पिंपरी-चिंचवड : २६,११८, पुणे ग्रामीण : ७,६४१, पुणे कँटोन्मेंट आणि जिल्हा रुग्णालय : ४,४६८)

राज्यात गुरुवारी १० हजार ८५४ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून राज्यातील रुग्ण बरे होणाचे प्रमाण ६५.९४ टक्के एवढे झाले आहे. आतापर्यंत राज्यभरात ३ लाख १६ हजार ३७५ रुग्ण बरे झाले आहेत. तर सध्या १ लाख ४६ हजार ३०५ रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या एकूण २४ लाख ८७ हजार ९९० नमुन्यांपैकी ४ लाख ७९ हजार ७७९ नमुने करोना पॉझिटिव्ह (१९.२८ टक्के) आले आहेत. राज्यात ९ लाख ७६ हजार ३३२ लोक होम क्वारंटाइनमध्ये आहेत तर ३७ हजार ७६८ लोक संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत. राज्यात गेल्या २४ तासांत ३१६ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ३.५० टक्के एवढा आहे. हा मृत्यूदर कमी करण्याचे मोठे आव्हान आहे.

Maharashtra14 News

Recent Posts

आता नागरिकांच्या तक्रारींचा जागेवरच होणार निपटारा … पोलिस आयुक्तांचे आदेश

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२० मे) : नागरिकांशी थेट संवाद साधता यावा, तक्रारदारांची गैरसोय होऊ नये…

7 hours ago

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने ५ अनधिकृत जाहिरात फलकांवर निष्कासनाची कारवाई

महाराष्ट्र 24 न्यूज, दि. २० मे २०२४ - पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने शहरातील अनधिकृत जाहिरात…

22 hours ago

उद्या दुपारी एक वाजता बारावीचा निकाल जाहीर होणार, विध्यार्थ्यांना आणि पालकांना निकालाची उत्सुकता

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२० मे) : महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक मंडळाच्यावतीनं (MSBSHSE) बारावीच्या परीक्षेच्या निकालाची…

24 hours ago

मोशीत वादळी वाऱ्यासह पाऊसामुळे “या” ठिकाणी ; भलं मोठं लोखंडी होर्डिंग कोसळलं

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.1६ मे ) : पिंपरी चिंचवड शहरातील मोशी, डुडळगाव, चऱ्होली परिसरात सोसाट्याच्या…

5 days ago

चिंचवड ठरविणार मावळच्या विजयाची गणिते, … ४ जूनला कोणती शिवसेनेचा गाठणार दिल्ली? ?

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१५ मे) : लोकसभेचे मतदान पार पडल्यानंतर आता मावळ विधानसभा मतदारसंघात मताधिक्य…

6 days ago

नवी सांगवीत या शाळेत झाले बोगस मतदान … तर, मोबाईल बंदी मुळे अनेक मतदार गेले माघारी … पोलिस आणि मतदारांमध्ये हुज्जत

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१३ मे) : मावळ लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी (दि. १३) मतदान झाले. सकाळी…

1 week ago