Google Ad
Editor Choice

पिं.चिं.मनपाच्या १०५ प्राथमिक व १८ माध्यमिक शाळेंकरिता ‘कोविड प्रतिबंधात्मक साहित्या’चे मोफत वाटप

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ जानेवारी) : कोरोना १९ संक्रमणामुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण असल्याचे दिसते. त्यामुळे आपल्या शाळेत व परिसरात सकारात्मक वातावरण व  ‘कोविड पासून सुरक्षा या करिता उपक्रम राबविणे गरजेचे आहे. या उपक्रमांमुळे कोविड संक्रमण रोखण्यास मदत होईल, तसेच पालकांचा आणि विद्यार्थाचा विश्वास वाढवता येईल त्याचप्रमाणे आपल्या शाळा सुरळीत चालवता येतील .

हाच विचार डोळ्यासमोर ठेऊन शिक्षण समिती आणि CSR Cell PCMC यांचे मध्यामातून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सर्व ( १०५ प्राथमिक व १८ माध्यमिक ) शाळेंकरिता ‘कोविड प्रतिबंधात्मक साहित्या’चे वाटप केले जाणार आहे.

Google Ad

सदर उपक्रम विनामूल्य स्वरूपाचा असून CYDA व होप फॉर चिल्ड्रेन फॉडेशन या संथेंच्या वतीने राबविले जाणार आहेत. या उपक्रमास Atlas Copco Ltd आणि Mahindra CIE Ltd. या कंपनी CSRद्वारे मदत केली जाणार आहे .

या अनुषंगाने संबधित या संथेंच्या वतीने शिक्षण विभागास ‘कोविड सुरक्षा वस्तू’ हस्तांतरीत करण्याचा करण्याचा कार्यक्रम आज दि. 6 जानेवारी रोजी सौ माधवी राजापुरे शिक्षण समिती सभापती, शिक्षण समिती सदस्या सौ मनिषाताई पवार, सौ सारिकाताई सस्ते, सौ प्रियांकाताई बारसे, सौ अश्विनीताई वाघमारे, शिक्षण प्रशासन अधिकारी गौड मॅडम  व अधिकारी यांचे प्रमुख उपस्थितीत पार पडला. तसेच या कार्यक्रमास CYDA या संस्थेच्या वतीने कार्यक्रम प्रमुख प्रविण जाधव व CSR Cell सल्लागार विजय वावरे उपस्थीत होते.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!