Categories: Uncategorized

बलशाली भारत घडवण्याच्या राष्ट्रकार्यात योगदान द्या! – भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांचे आवाहन – नवनिर्वाचित कार्यकारिणीचा पदवाटप समारंभ

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२३ नोव्हेंबर) : संघटनेत काम करताना ‘एकमेकां सहाय्य करू’ हे धोरण प्रत्येकाने अंगीकारताना आपले १०० टक्के योगदान देणे गरजेचे आहे. कार्यकारिणी आणि कार्यकर्ता हे आपल्या संघटनेची दोन चाके आहेत. या दोन्ही गोष्टीच्या माध्यमातून आपले ‘उद्दिष्ट’ साध्य करता येवू शकते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वात भारत जगातील बलशाली राष्ट्र म्हणून विकसित होत आहे. या राष्ट्रकार्यामध्ये आपले योगदान द्यावे, असे आवाहन भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी केले.

पिंपरी-चिंचवड भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी पदभार स्वीकारल्यानंतर कार्यकारिणी जाहीर केली होती. या कार्यकारीणीचा पदवाटप कार्यक्रम मोरवाडी येथील पक्षाच्या मध्यवर्ती जनसंपर्क कार्यालयात बुधवारी झाला. यावेळी जगताप बोलत होते.

यावेळी वरिष्ठ उपाध्यक्ष व प्रवक्ते राजू दुर्गे, भाजपा शहर सरचिटणीस शीतल शिंदे, शैला मोळक, अजय पाताडे, संजय मंगोडीकर, नामदेव ढाके, मावळ विधानसभा संयोजक सदाशिव खाडे, चिंचवड विधानसभा निवडणूक प्रमुख काळुराम बारणे, भाजयुमो शहराध्यक्ष तुषार हिंगे, शहर अनुसूचित जाती मोर्चाचे अध्यक्ष भीमा बोबडे, महिला मोर्चाच्या अध्यक्षा सुजाता पालांडे, मंडल अध्यक्ष प्रसाद कस्पटे, सोमनाथ भोंडवे, संदीप नखाते, संतोष तापकीर आदी उपस्थित होते.

शहराध्यक्ष शंकर जगताप म्हणाले की, पक्षाची धोरणे, मूल्ये ही सर्वात आधी कार्यकारिणीमध्ये रुजविणे आवश्यक आहे. हीच मूल्ये शेवटच्या मतदारांपर्यंत पोहचविण्याची सर्वात मोठी जबाबदारी कार्यकारिणीवर असते. एकदा ही मूल्ये आणि धोरणे शेवटच्या मतदारापर्यंत पोचविली की, तो मतदार शेवटपर्यंत पक्षाशी जोडला जातो, असा मतदार जोडणे हेच सध्याच्या कार्यकारिणीचे प्रमुख उद्दिष्ट्य आहे.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय मंगोडीकर यांनी, तर आभार अजय पाताडे यांनी मानले.

भाजपा शहर कार्यकारिणीमध्ये समाविष्ट केलेल्या प्रत्येक पदाधिकाऱ्याकडे विशेष कौशल्य आहे. त्या कौशल्याचा वापर पक्ष संघटना सक्षमीकरणासाठी झाला पाहिजे.  आगामी काळ निवडणुकीचा असल्याने कार्यकारिणी आणि कार्यकर्ता या दोघांवर मोठी जबाबदारी असणार आहे. त्या अनुशंगाने बूथ यंत्रणा सक्षम करण्यासोबतच केंद्र आणि राज्य सरकारचे महत्त्वाकांक्षी विकास प्रकल्प आणि कल्याणकारी योजना तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प आम्ही केला आहे.
शंकर जगताप, शहराध्यक्ष, भाजपा, पिंपरी-चिंचवड.

Maharashtra14 News

Recent Posts

मतदारांना आवाहन – मतदारांना मतदान केंद्रावर मोबाईल आणण्यास मनाई

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१७ नोव्हेंबर २०२४ : लोकशाहीचा उत्सव शांततेत व निर्भय वातावरणात पार पडावा,…

4 days ago

पिंपरीत योगेश बहल यांची शिष्टाई पिंपरीत महायुतीत मनोमिलन …. अण्णा बनसोडे यांना विक्रमी मतांनी विजयी करण्याचा निर्धार

महाराष्ट्र 14 न्यूज, दि. १५ नोव्हेंबर २०२४) पिंपरी मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचे उमेदवार अण्णा बनसोडे…

6 days ago

गावच्या स्मार्ट विकासासाठी शंकर जगताप यांच्या नेतृत्वावर चिंचवडवासीयांचा विश्वास

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१५ नोव्हेंबर २०२४ - चिंचवड विधानसभेत सध्या पिण्याचे पाणी, वाहतूक कोंडी, नदी…

6 days ago

चिंचवड विधानसभा मतदारसंघातील निवडणूक प्रक्रिया नि:पक्षपातीपणे, पारदर्शक वातावरणात-निवडणूक निर्णय अधिकारी अनिल पवार..

महाराष्ट्र 14 न्यूज, दि. १४:- चिंचवड विधानसभा मतदारसंघासाठी उपलब्ध मतदान यंत्रांच्या प्रथम आणि द्वितीय सरमिसळ…

6 days ago

चिंचवड मतदारसंघातील धनगर समाजाची ताकद शंकर जगताप यांच्या पाठीशी … शंकर जगताप यांना धनगर क्रांती सेना महासंघाचा जाहीर पाठींबा

महाराष्ट्र 14 न्यूज, दि. १४ नोव्हेंबर २०२४ - चिंचवड विधानसभा मतदारसंघातील भाजप - शिवसेना -…

1 week ago