Google Ad
Editor Choice

दुःखातही सुरू असलेली निरंतर आरोग्य सेवा … हीच खरी लक्ष्मणभाऊंना श्रद्धांजली

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०९ जानेवारी) : वेळ सकाळची आमदार लक्ष्मण जगताप यांच्या कार्यालयात असणाऱ्या ‘वैद्यकीय सेवा कक्षा’ समोर नागरिक गर्दी करून उभे होते. लक्ष्मणभाऊंनी रुग्णांना रोगाच्या निदानापासून रोगाच्या निवरणा पर्यंत सर्वाना पूर्ण मदत केली आहे, त्यामुळेच कोणाचे हॉस्पिटलचे बिल कमी करायचे असो, कुणाला आय सी यु बेड हवे, कोणाला कानाचे मशीन पाहिजे, कोणाचा एम आर आय करायचा तर कोणाचे डोळ्यांचे ऑपरेशन करायचे असे अनेक नागरिक आणि रुग्ण व रुग्णांचे नातेवाईक ऑफिस उघडण्याची वाट पहात उभे होते. 

ऑफिस उघडले एक अपंग ( दिव्यांग ) व्यक्ती भाऊंच्या निधनाची बातमी ऐकायला मिळाल्याने त्यांचे बंधू आणि कुटुंबातील व्यक्तींना भेटण्यासाठी आली होती, बोलताना डोळ्यात अश्रू दाटून म्हणाली,

Google Ad

माझ्या भाऊंना देवाने असे कसे नेहले हो” ? माझं आयुष्य त्यांना दयायचे होते देवाने, नाहीतरी आमचा जगून काय उपयोग … माझ्या देवाने मला पाय दिले होते, आणि त्यामुळेच मी येथे येऊ शकलो!

बोलताना त्यांना हुंदका आवरत न्हवता, त्यांचे अश्रू पाहून माझ्यासह इतरांनाही रडू कोसळले! अनेक रुग्ण ही हळहळ व्यक्त करत होते.

“हा देव माणूस होताच तसा”, या देव माणसाचे आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांचे दि.०३ जानेवारी रोजी दुःखद निधन झाले. त्यामुळे त्यांच्या कार्यालयातली दररोज असणारी नागरिकांची वर्दळ स्तब्द झाली होती, परंतु त्यांनी सुरू केलेल्या अखंड आरोग्य सेवेचे व्रत, असलेले ‘वैद्यकीय साहाय्यता कक्ष कार्यालय’ आजही अखंडपणे सुरू होते आणि आहे. या डोंगरा एवढ्या दुःखातही याठिकाणी येणारे रुग्ण आणि त्यांना लागणारी रुग्णालईन मदत, त्यांचे कुटुंब विनाखंड करत आहे. यात कोणाचे मोतीबिंदू ऑपरेशन, कोणाचे हार्टचे ऑपरेशन, कोणाचे डायलिसिस तर काही दुर्धर आजाराने ग्रस्थ अनेक रुग्ण दररोज या ठिकाणी येत आहेत.

आमदार लक्ष्मण जगताप यांनी आपल्या भागातील गोरगरीब नागरिकांच्या आरोग्याचा विचार करून आजपर्यंत पाच वेळा मोठ्या प्रमाणावर आरोग्य शिबिरे घेतली, यात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातुन रुग्ण लाभ घेण्यासाठी येत होते. यात कोणताही भेदभाव न्हवता, यात नामवंत हॉस्पिटलचा सहभाग असे, आपल्या नागरिकांना उत्तम अशी आरोग्य सेवा उपलब्ध व्हावी हे लक्ष्मणभाऊ यांचे ध्येय होते, आणि या शिबीरांच्या माध्यमातून त्यांनी ते साध्यही केले. मागील महिन्यात डिसेंबर २०२२ मध्ये झालेल्या आरोग्य शिबिरात आजार बळावलेल्या ३५ हजारहून अधिक रुग्णांवर मोफत उपचार करण्यात आले. त्याचप्रमाणे ह्दयरोग झालेल्या सुमारे ४ हजार जणांवर मोफत उपचार करण्यात आले. शिबीराच्या ठिकाणी तीन हजारहून अधिक मुला-मुलींचे मोफत समुपदेशन करण्यात आले. ५० हजार जणांना चष्म्यांचे, ४५० जणांना श्रवणयंत्रांचे आणि १५० दिव्यांगांना जयपूर फूट, कॅलीपर्स, व्हिलचेअर आणि चालण्याच्या काठीचे मोफत वाटप करण्यात आले.शिबीरासाठी मुंबई, पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील अनेक नामांकित रुग्णालय, तेथील तज्ज्ञ डॉक्टरांना आमंत्रित करण्यात आले होते. या तज्ज्ञ डॉक्टरांनी लहान बालकांपासून वयोवृद्धापर्यंत सर्व वयोगटातील रुग्णांची तपासणी आणि त्यांच्यावर मोफत उपचार केले. आजारावर शस्त्रक्रियेची गरज असलेल्या रुग्णांवर संबंधित रुग्णालयांमध्ये मोफत शस्त्रक्रिया केल्या जाणार आहेत. त्यामुळे शिबिर संपन्न झाल्यानंतर ही पुढील उपचारासाठी, तपासण्या करण्याकरीता रुग्ण त्यांच्या वैद्यकीय साहाय्यता कक्षास फोन करून भेट देत आहेत.

त्यामुळे आमदार लक्ष्मण जगताप यांनी घेतलेले अखंड आरोग्य सेवेचे व्रत हीच त्यांना खरी भावपूर्ण श्रद्धांजली, असल्याचे आजही त्यांच्या सुरू आरोग्य सेवेवरून दिसून येत आहे.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Ad

Advertisement 2

ad

Advertisement 3

ad

Advertisement

error: Content is protected !!