Google Ad
Uncategorized

सांगवी येथे संविधान दिन उत्साहात साजरा

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२६ नोव्हेंबर) : पिंपरी चिंचवड शहरातील सांगवी येथे २६ नोव्हेंबर रोजी संविधान दिन साजरा करण्यात आला,याप्रसंगी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबडेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालुन अभिवादन करण्यात आले तसेच संविधान उद्देशिकेचे वाचन करण्यात आले.

२६ नोव्हेंबर १९४९ मध्ये भारतीय संविधान सभेने भारताची राज्यघटना स्विकारली. त्यामुळे, २६ नोव्हेंबर हा दिवस भारतीय संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. परंतु, संविधान सभेने ही राज्यघटना स्विकारल्यानंतर देशात त्याची अमंलबजावणी होण्यास काही महिने लागले. २६ जानेवारी १९५० रोजी ही राज्यघटना पूर्णपणे लागू करण्यात आली.

Google Ad

राज्यघटना हि १९५० रोजी लागू झाली असली तरी आजही संविधान लागू करण्याचे उद्देश काय याची अनेकांना माहिती नाही त्यामुळे जनजागृती करण्याच्या दृष्टीने प्रत्येक वर्षी २६ नोव्हेंबर रोजी संविधान उद्देशिकेचे वाचन करण्याचे शासनाचे निर्देश आहेत त्यानुसार संविधान दिन साजरा करण्यात आला.

याप्रसंगी माजी नगरसेवक संतोष कांबळे, सिनेट सदस्य कृष्णा भंडलकर तसेच परिसरातील नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना माजी नगरसेवक संतोष कांबळे म्हणाले, ”डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अलौकिक बुद्धिमत्तेतून संविधानाची निर्मिती झाली आणि कित्येक वर्ष गुलामगिरीच्या जोखडाखाली असलेला समाज न्याय, स्वातंत्र्य, समता व बंधुता या देणगीवर वाटचाल करू लागला. संविधानामुळे माणूस स्वतंत्र झाला. त्याला आचार विचार व विहार करणे शक्य झाले.

Google Ad

Featured

Advertisement 1

Ad

Advertisement 2

ad

Advertisement 3

ad

Advertisement

error: Content is protected !!