Google Ad
Editor Choice

पिं चिं शहरातील नागरिकांची होणारी गैरसोय विचारात घेता मनपाच्या आठ क्षेत्रिय कार्यालयांमधून  KIOSK द्वारे  केंद्रीय पध्दतीने लसीकरणाचे टोकन उपलब्ध करून देणार!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दिनांक २० जुलै २०२१) : सद्य:स्थितीत पिंपरी चिंचवड महानगपालिका केंद्र व राज्य शासनाच्या सहयोगातून मनपा कार्यक्षेत्रातील नागरिकांना (वयोगट – १८ ते ४४ व ४५ वर्षापुढील) मोफत कोविड लसीकरण अभियान राबवित आहे.  सदर मोफत कोविड लसीकरणाची मोहिम मनपाच्या विविध कार्यक्षेत्रामध्ये उपलब्ध करून देणेत आलेल्या लसीकरण केंद्रांद्वारे कार्यान्वित आहे.

सद्य:स्थितीत विविध लसीकरण केंद्रांद्वारे नागरिकांना ऑनलाईन पध्दतीने व लसीकरण केंद्रांवर टोकन उपलब्ध करून देऊन लसीकरण मोहिम राबविणेत येत आहे.  लसीकरण केंद्रावर दिले जाणारे टोकन पध्दतीबाबत नागरिकांचा रोष दिसून येत आहे.  तसेच नागरिकांमध्ये वारंवार वाद विवादाचे प्रसंग उद्भभवत असल्याचे निदर्शनास आलेले आहे.

Google Ad

तथापि, सदर नागरिकांची होणारी गैरसोय विचारात घेऊन महापालिका आयुक्त मा.श्री.राजेश पाटील सो. यांचे निर्देशानुसार मनपाने स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत उपलब्ध करून देणेत आलेल्या KIOSK मार्फत नागरिकांना प्रथम येणा-यास प्रथम प्राधान्य या संकल्पनेनुसार मनपाच्या एकूण आठ क्षेत्रिय कार्यालयांमधून KIOSK द्वारे  केंद्रीय पध्दतीने टोकन उपलब्ध करून देणेची व्यवस्था आज,  मंगळवार,  दि.२०.०७.२०२१ रोजीपासून कार्यान्वित करणेत आलेली आहे.

सदर KIOSK द्वारे उपलब्ध करून देणेत आलेली संगणक प्रणालीनुसार नागरिकांने आपल्या राहत असलेल्या मनपाच्या आठ क्षेत्रिय कार्यालयापैकी जवळील क्षेत्रिय कार्यालयामध्ये येऊन KIOSK मध्ये आपला मोबाईल क्रमांक, जन्म वर्ष, प्रथम अथवा द्वितीय लस इत्यादीची नोंद करून नागरिकांच्या मोबाईल क्रमांकावर उपलब्ध होणारा OTP, KIOSK मध्ये नोंदवून नागरिक आपली माहिती समाविष्ठ करू शकतात. सदर नोंद झाल्यानंतर नागरिकांस KIOSK मधून छापील टोकन क्रमांक प्राप्त होईल तसेच टोकन क्रमांक SMS द्वारे नागरिकांस पाठविणेत येईल.

सदर पध्दतीने नागरिकांची लसीकरणासाठी नोंद झालेनंतर शासनामार्फत उपलब्ध होणा-या दररोजच्या डोस संख्येनुसार केंद्रीय पध्दतीने नागरिकांची निवड करून संगणक प्रणालीद्वारे SMS पाठवून नागरिकांनी निवड केलेल्या लसीकरण केंद्रामध्ये बोलविणेत येऊन लसीकरण करणेत येईल.

द्वितीय डोस बाबत ज्या नागरिकांचे कोविशिल्ड या लसीकरणासाठी ८४ दिवस व कोव्हॅक्सिन लसीकरणाचे २८ दिवस पुर्ण झाले असतील तरच नागरिकांना दूसरा डोस देण्यात येईल. सदर दिवसांची पुर्तता झाली नसल्यास संबंधित क्रेंदावर नागरिकांना डोस नाकारण्यात येईल. नागरिकांचे लसीकरण पुर्ण झालेशिवाय संबंधित मोबाईल क्रमांक नागरिकांस टोकन घेणेसाठी वापरणेत येणार नाही. नागरिकांचे लसीकरण पुर्ण झालेनंतर सदर मोबाईल क्रमांक घरामधील इतर सदस्यांना टोकन घेणेकामी नागरिक वापरू शकतात.

तसेच केंद्रीय पध्दतीने लसीकरणासाठी निवड झालेल्या नागरिकांस प्रमाणित करण्यात आलेल्या लसीकरणासाठी जाणे शक्य नाही झाल्यास संबंधित नागरिकांस पुनश्च: नव्याने टोकन घेऊन प्रतिक्षा यादीमध्ये आपले नाव समाविष्ठ करावे लागेल. लसीकरण केंद्रावरती नागरिकांना त्यांस प्राप्त झालेला SMS अथवा KIOSK द्वारे देण्यात आलेली टोकन प्रत दाखवून त्याबाबतची खात्री झालेनंतरच लसीकरण करणेत येईल.

नागरिकांची होणारी गैरसोय विचारात घेता सद्य:स्थितीत लसीकरण केंद्रावर देणेत येणारी टोकन पध्दत बंद करण्यात येणार असून यापुढे सर्व लसीकरण KIOSK संगणक प्रणालीद्वारे निर्गमित करणेत येणा-या टोकन पध्दतीनुसार राबविणेत येणार आहे.  तसेच KIOSK द्वारे उपलब्ध करून देणेत येणा-या टोकन पध्दतीबाबत नागरिकांचा प्राप्त होणार प्रतिसाद विचारात घेऊन सदर KIOSK ची संख्या ही वेळोवेळी वाढविण्यात येणार आहे.


तरी महानगरपालिकेमार्फत नव्याने लसीकरणासाठी उपलब्ध करून देणेत आलेल्या टोकन पध्दतीचा शहरातील सर्व नागरिकांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे अवाहन महापौर सौ.उषा उर्फ माई मनोहर ढोरे व महापालिका  आयुक्त मा.श्री.राजेश पाटील यांनी केले आहे.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

11 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!