Google Ad
Editor Choice

‘जनसेवा हीच ईश्वर सेवा’ मानत मधुकर बच्चे युवा मंचच्या वतीने गरीब गरजूंना किराणा, कपडे, मास्क आणि सॅनिटायझरचे वाटप!

महाराष्ट्र 14 न्यूज : सध्या कोरोना महामारीमुळे अनेक लोकांचे आर्थिक हाल होत आहेत.काहींना तर रोजचे किराणा वगैरे भरणे पण अवघड झाले आहे. हा सगळा विचार करून मधुकर बच्चे युवा मंच व सर्व सहकारी गेल्या दीड वर्षांपासून अनेक प्रकारचीअविरत कामे करीत आहोत.

आपण समाजाचे नक्कीच काहीतरी देणे लागतो व आपण समाजाच्या कामा आलोच पाहिजे या भावनेतून मधुकर बच्चे युवा मंचचे अखंड कार्य आजही सुरू आहे. गेल्या वर्षी सप्टेंबर २०२० मध्ये त्यांनी घरकाम करणाऱ्या महिला,व सोसायटी वाचमेन अश्या अनेक गरजूंना किराणा ,कोरोना प्रतिबंधक किट व आवश्यक वस्तू मोफत वाटप केल्या होत्या. या वर्षी पुन्हा लॉक डाऊन लागल्यामुळे ज्यांचे रोजंदारीवर किंवा नाजून आर्थिक परिस्थिती आहे त्याचे जीवन अवघड झाले आहे. त्यामुळे मधुकर बच्चे यांच्या पुढाकाराने व ‘मधुकर बच्चे युवा मंच’ व अनेक सहकार्यानी योगदान देऊन दि.३ मे २०२१ रोजी परिसरातील गरजूंनसाठी अनेक उपक्रम राबविले.

Google Ad

या उपक्रमात परिसरातील घरकाम करणाऱ्या महिला व सोसायट्या वाचमेन यांना किराणा दिला, जागोजागी झोपडी (पाल) करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या कुटुंबाना कपडे, सॅनिटांयझर,मास्क व आवश्यक वस्तू वाटप केल्या तसेच
परिसरातील सर्व नागरिकांचे आरोगयासाठी ऑक्सिजन पातळी चेक,पल्स चेक, ब्लड (बीपी) चेक टेम्प्रेचर (ताप) चेक आदी शिबीर आयोजित केले याचा अनेक नागरिकांना या कोरोनाच्या संकट काळात फायदा झाला.

या उपक्रमात मधुकर बच्चे सदस्य: महाराष्ट्र महावितरण समिती व सचिव भाजपा यांच्या पुढाकाराने व भाजपा भटके आघाडी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सौरभ शिंदे, गणेश बच्चे, गिरीश हंपे, राजू कोरे, बबन बच्चे, यांनी पूर्ण सहकार्य करून उपक्रमात भाग घेतला तर चैतन्य मेडिको & चैतन्य डायगणोस्टिक यांच्या वतीने रोहिणी बच्चे ,श्रावणी बच्चे,अर्चना बच्चे यांनी शिबिराचे पूर्ण नियोजन केले .

यावेळी बोलताना मधुकर बच्चे म्हणाले, ‘जोपर्यंत कोरोना महामारी आहे तोपर्यंत मधुकर बच्चे युवा मंच वतीने गरजूंना शक्य तेवढी मदत करीत राहणार आहोत समाजातील
सुस्थितीत असणाऱ्या नागरिकांनी या उपक्रमास हात भार लावावा असे आवाहनही त्यांनी केले.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

120 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!